पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आश्वासनांची खैरात केली आहे. मोफत कोरोना लस, सरकारी नोकरीसारख्या लोकानुनयी घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रचारात वैयक्तिक चिखलफेक केली जात आहे. आता पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी, 'टाइम्स नाऊ'ने पुन्हा एकदा ओपिनियन पोल जाहीर केले आहेत.
टाइम्स नाऊ आणि सी व्होटरने पुन्हा एकदा ओपिनयन पोल घेतला आहे. सर्व 243 विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ओपिनयन पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येण्याचा अंदाज आहे. एनडीएला 147 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक 77 जागा मिळू शकतील. तर त्यांचा सहयोगी पक्ष जेडीयूला 63 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर यूपीएला 87 जागा मिळू शकतील. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला 60, काँग्रेसला 16 आणि डाव्या आघाडीला 11 जागा मिळू शकतात.
हा सर्व्हे 1 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरदरम्यान करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार चिराग पासवान यांच्या नेतृत्त्वाखालील एलजेपीला केवळ 3 जागा मिळू शकतात. हा सर्वात धक्कादायक अंदाज आहे. इतर पक्षांना केवळ 6 जागा मिळू शकतील.
भोजपूरमध्ये एनडीएला 30 तर यूपीएला 13 जागा मिळण्याचा अंदाज, मगधमध्ये एनडीएला 32 आणि यूपीएला 20, मिथिलामध्ये एनडीएला 27 तर यूपीएला 14 जागा मिळू शकतात. अंग प्रदेशमध्ये एनडीएला 14, यूपीएला 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सीमांचलमध्ये एनडीएला 13 आणि यूपीएला 10 जागा मिळू शकतात. तिरहूटमध्ये एनडीएला 31 आणि यूपीएला 16 जागा मिळण्याच अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.