EVM विरोधात विरोधक एकवटले! मतं थेट भाजपला जातात, आयोगाला जाब विचारणार

sharad pawar
sharad pawar
Updated on

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये काँग्रेसमधून कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह, राम गोपाल यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 

बैठकीचा अजेंडा ईव्हीएममध्ये ठेवण्यात आला होता. यावेळी ईव्हीएम मशीनच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आला. बैठकीनंतर विरोधी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

कपिल सिब्बल म्हणाले, देशात ईव्हीएमचा दुरुपयोग होत आहे. निवडणूक आयोगाकडे मागणी करून देखील ते दुर्लक्ष करतात. निवडणूक आयोगासमोर आम्ही अनेकवेळा गेलो आहोत. मशीन खराब होऊ शकतात, असे आम्ही त्यांना सांगितले आहे.

आपण बघितले आहे. जेव्हा मशीन खराब होते तेव्हा त्यातील मते भाजपला जातात. हा विषय फक्त राजकीय नाही तर जनतेला देखील हा विषय माहिती आहे, असे सिब्बल म्हणाले.

sharad pawar
Coronavirus News Updates: देशातील फैलावलेला कोरोना ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट; आरोग्य विभागाची महत्वाची अपडेट

यासंदर्भात आजपर्यंत निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही निवडणूक आयोगासमोर जाणार आणि त्यांना शेवटचं विचारणार आहोत. तुम्ही याबाबत काय करणार आहात. तसेच आमच्या प्रश्नांचे लिखित स्वरूपात उत्तर मागणार आहोत. जर त्यांनी उत्तर दिले नाही तर आम्ही मिळून हा निर्णय घेणार आहोत की समोर काय करावे, असे कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. 

बाकी देशात ईव्हीएमता वापर होत नाही तर आपल्या देशात का होत आहे, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकणे हे आम्हाला मान्य नाही. 

sharad pawar
Shaniwar Wada : माहिमनंतर शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची मागणी, थेट राज ठाकरेंना सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.