INDIA Vs NDA : 'इंडिया' शब्द इंग्रजांनी आणला; भाजपने विरोधकांच्या एकीची उडवली खिल्ली

INDIA Vs NDA
INDIA Vs NDAesakal
Updated on

नवी दिल्लीः बंगळूरुमध्ये देशभरातील विरोधकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये २६ पक्ष सहभागी झाले होते. आजच्या बैठकीमध्ये विरोधी संघटनांच्या आघाडीला इंडिया नाव देण्यात आलेलं आहे. 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स' असा या नावाचा फुल फॉर्म सांगण्यात आला.

दरम्यान 'इंडिया' या शब्दावरुन भाजपने रान उठवलेलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, आमची संस्कृती, आमचा संघर्ष भारत आणि भारताभोवती केंद्रित आहे. इंग्रजांनी भारताला 'इंडिया' नाव दिले आणि काँग्रेसने ते मान्य केले. या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, 'इंडिया'साठी काँग्रेस आणि भारतासाठी मोदी, हे समीकरण आहे.

INDIA Vs NDA
बाळासाहेबांनीही केली होती काँग्रेसशी मैत्री; 6 वर्षांच्या मैत्रीनंतर असे गेले होते भाजपसोबत

'इंडिया' नावावरुन झालेल्या टीकेला काँग्रेसनेही जोरदार उत्तर आले. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी उत्तर दिलं की, संविधानचा अनुच्छेद १..इंडिया म्हणजेच भारत, विविध राज्यांचा एक संघ असा आहे. भारत आणि इंडिया एकच असल्याचं जयराम रमेश यांनी सांगितलं.

दरम्यान, 'एनडीए'च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आसन व्यवस्था असल्याने भाजपला हे नेते किती महत्त्वाचे वाटत आहेत, हे दिसून येतंय.

INDIA Vs NDA
"मला माझ्या प्रियकराची भेट घडवा..."; महिलेचा टॉवरवर चढून हाय-व्होल्टेज ड्रामा

बंगळूरु येथील विरोधकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना खर्गे म्हणाले की, विरोधकांची पुढची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. त्याच बैठकीत ११ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ती नावं मुंबईत जाहीर करण्यात येतील आणि ही समिती पुढचे निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.