Patna Opposition Meeting : लोकसभेची रणनीती! देशभरातील विरोधकांची आज पाटण्यात बैठक

Opposition Meeting in Patna today Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sharad Pawar Supriya Sule attend mega opposition meeting
Opposition Meeting in Patna today Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sharad Pawar Supriya Sule attend mega opposition meeting
Updated on

लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तसा राजकीय हलाचालींना वेग येताना दिसत आहे. भाजपविरोधात मोर्चेबांधणीसाठी आज, २३ जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज या सभेला उपस्थित राहण्यासाठी पाटण्याला रवाना झाले.

विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वीच मतभेदाचे सूर उमटू लागले आहेत. दिल्लीशी संबंधित केंद्र सरकारच्या अध्यादेशाला काँग्रेसने पाठिंबा न दिल्यास कधीही बैठक सोडण्याची आम आदमी पार्टीची धमकी असतानाच, पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पाटणा गाठून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नितीश कुमार यांचीही भेट घेतली. जेडीयूच्या सूत्रांनी सांगितले की, इतर विरोधी पक्षांप्रमाणे काँग्रेसनेही राज्यसभेत अध्यादेशाला आपला विरोध जाहीर करावा, अशी आपची इच्छा आहे.

Opposition Meeting in Patna today Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sharad Pawar Supriya Sule attend mega opposition meeting
Teacher Recruitment : तब्बल बारा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला सरकारचा हिरवा कंदील

दरम्यान काँग्रेसचे नेते अधीरंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या विरोधी एकजुटीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सत्ताधारी तृणमूलवर पंचायत निवडणुकीत हिंसाचाराचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे.

पंचायत निवडणुकीत माकप-काँग्रेस आघाडीवर नाराज झालेल्या ममता यांनी काँग्रेसला सहकार्य न करण्याची घोषणा केली होती. मात्र, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे काँग्रेस आणि ममता यांच्यात सुरू असलेली कटूता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हेही सायंकाळी उशिरा पाटणा येथे पोहोचले होते.

Opposition Meeting in Patna today Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sharad Pawar Supriya Sule attend mega opposition meeting
Goat Farming: शेतकऱ्यांना दिलासा! शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी; सरकार देणार येवढं अनुदान; वाचा सविस्तर

या पार्श्वभूमीवर विरोधक एकत्र येत आहे. लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान पदाचा उमेदावर कोण असेल तसेच भाजपला रोखण्यासाठीच्या व्ह्यूरचनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या बैठकीतून नेमकं काय साध्य होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.