Vibhav Kumar : विभव कुमारांच्या याचिकेला विरोध

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी साहायक विभव कुमार यांनी अटकेला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेला दिल्ली पोलिसांनी विरोध केला आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.
Vibhav Kumar
Vibhav Kumar sakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी साहायक विभव कुमार यांनी अटकेला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेला दिल्ली पोलिसांनी विरोध केला आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप विभव कुमार यांच्यावर आहे. ​

कुमार यांना घाईगडबडीने अथवा कोणत्या विशिष्ट उद्देशाने अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तर, कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला होता आणि तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवूनही त्यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली होती, असा युक्तिवाद विभव कुमार यांच्या वकिलांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी यास विरोध केला. भविष्यात विभव यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.