Hindu Religion : जगन्नाथ मंदिराचे हे रहस्य सांगत अशा अज्ञात ऊर्जेविषयी, जी समजणे अशक्य

ओडिशातील पुरी इथले जगन्नाथ मंदिर म्हणजे देशाचा असा वारसा आहे, ज्यात अनेक राज लपले आहेत.
Jagannath Mandir
Jagannath Mandiresakal
Updated on

Orissa Jagannath Puri Temple Mystery : ओडिशातील पुरी इथले जगन्नाथ मंदिर म्हणजे देशाचा असा वारसा आहे, ज्यात अनेक राज लपले आहेत. खरंतर भारतात अशा अनेक जागा आहेत जिथे मनुष्याची विचार करण्याची क्षमता संपते तिथून या शक्तींचे चमत्कार सुरू होतात. तिथेच असे काही रहस्य जन्माला येतात जे समजण्याच्या पलिकडचे असतात.

श्रीकृष्ण, बलराम आणि बहिण सुभद्रा यांचे हे जगन्नाथ मंदिर म्हणजे कोणतेही सामान्य मंदिर नाही. हे मंदिर जेवढे सुंदर आणि भव्य आहे, तेवढेच रहस्यमयी आहे.

Jagannath Mandir
Jagannath Mandiresakal

सनातन धर्माचे वैशिष्ट्य

  • पुरीचे जगन्नाथ मंदिर सनातन धर्माच्या मुख्य चार धामपैकी एक आहे. एवढेच नाही तर वैष्णव संप्रदायात ज्या १०८ पवित्र मंदिरांचा उल्लेख आहे त्यात या मंदिराचा समावेश आहे.

  • दहाव्या शतकात या मंदिराला हानी पोहचवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, पण सगळेच यशस्वी ठरले.

  • असं म्हटलं जातं औरंगजेबाने याला अनेकदा तोडण्याचा, नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला एकदाही यश आले नाही.

  • याशिवाय अजून या मंदिराचे अनेक तथ्य आहेत जे आश्चर्यचकीत करतात.

Jagannath Mandir
Jagannath Mandiresakal

ध्वजाचे रहस्य

जगन्नाथ मंदिराच्या घुमटावरील ध्वज विज्ञानाच्या सर्व तत्त्वांना नाकारताना दिसतो. विज्ञानानुसार वाऱ्याची दिशा कोणत्याही वस्तूला आपल्या दिशेने घेऊन जाऊ शकते. पण जगन्नाथ मंदिराच्या माथ्यावरचा ध्वज वाऱ्याच्या अगदी विरुद्ध दिशेने फिरतो. वारा कोणत्याही दिशेने वाहत असला तरीही, हा ध्वज फडकवण्याची दिशा निश्चित आहे.

Jagannath Mandir
Jagannath Mandiresakal

रोज बदलला जातो ध्वज

असं म्हटलं जातं की, मंदिराच्या घुमटावर लावलेला हा ध्वज रोज बदलला जातो. असं मानलं जातं की, जर कोणत्याही कारणारी ज्या दिवशी हा ध्वज बदलला जाणार नाही त्या दिवशी हे स्थान १८ वर्षांसाठी बंद राहिल. जर या काळात मंदिराचे कपाट उघडले गेले तर प्रलयही येऊ शकेल.

Jagannath Mandir
Jagannath Mandiresakal

सुदर्शन चक्राचे रहस्य

  • मंदिराच्या घुमटावर एक सुदर्शन चक्रपण लावलेलं आहे. ज्याचं वजन हजार किलोच्या जवळपास आहे. विज्ञानालाही याचं उत्तर देता आलेलं नाही की, त्याकाळात असं कोणतही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना, एवढ्या वर हे चक्र पोहचलं कसं?

  • या शिवाय या सुदर्शन चक्राचे एक वैशिष्ट्य हे पण आहे की, कोणत्याही बाजूने बघा हे एकसारखंच दिसतं. या चक्राला तुम्ही मागे, पुढे, उजव्या, डाव्या कोणत्याही बाजूने बघा सारखेच दिसते.

  • या मंदिरावरून कधी कोणताही पक्षी किंवा विमान उडताना आजवर कोणी बघितला आहे. असं का? हे कोडं अजून तरी कोणाला उलगडलेलं नाही.

Jagannath Mandir
Jagannath Mandiresakal

मूर्तीचे रहस्य

  • दर १२ वर्षांनी जगन्नाथ मंदिराच्या मूर्ती बदलल्या जातात. आणि त्याकाळात संपूर्ण शहरात ब्लॅक आऊट केलं जातं. याशिवाय जो पूजारी या मूर्ती स्थापन करतो त्याच्याही डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते.

  • यावेळी पूजारी जुन्या मूर्तीतून ज्याला नील माधव म्हटलं जातं, त्यातून एक वस्तू बाहेर काढून त्याला नवीन मूर्तीत स्थापित करतो. कोणीही ती वस्तू बघितलेली नाही. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सशाने उड्या माराव्या असा काहीतरी त्या वस्तूचा स्पर्श असतो.

  • असं मानलं जातं की, ही वस्तू स्वतः श्रीकृष्णाचं हृदय आहे.

Jagannath Mandir
Jagannath Mandiresakal

लाटांचा आवाज

जगन्नाथ मंदिराचे हे अजून एक वैशिष्ट्य समजलं जातं की, समुद्र किनारी असलेल्या मंदिराच्या बाहेर लाटांचा खळखळाट, बाहेरचे आवाज, गोंधळ सगळं ऐकू येतं. पण जसे तुम्ही मंदिरात प्रवेश करतात सर्व आवाज, गोंगाट बंद होतात. आत तुम्हाला कसलाच आवाज ऐकू येत नाही. जणू काही तुम्ही एका वेगळ्याच जगात प्रवेश केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()