Osama bin Laden: लादेननं कुत्र्यावर केली होती केमिकल वेपनची ट्रायल; मुलाचाच खळबळजनक दावा

लादेनच्या मुलाने खळबळजनक दावा
Al-Qaeda
Al-Qaedaesakal
Updated on

Al-Qaeda: अल कायदा या दहशतवादी संघटनेचा मारला गेलेला म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या मुलाने खळबळजनक दावा केला आहे. त्याने त्याच्या वडिलांबद्दल सांगितले आहे की, लादेनच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी तो लहानपणापासून त्याला प्रशिक्षण देत असे. त्याला अफगाणिस्तानात बंदूक वापरण्याचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले.

इतकेच नाही तर लादेनने त्याच्या कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रे वापरण्याचाही प्रयत्न केला होता. लादेनचा चौथा मुलगा उमरने एका मुलाखतीदरम्यान आपल्या वडिलांसोबतच्या नातेसंबंधाबद्दल खुलेपणाने सांगितले. वडिलांसोबत घालवलेला वाईट काळ विसरण्याचा प्रयत्न केला म्हणून तो पिडित असल्याचे त्याने सांगितले.

41 वर्षीय उमर पत्नी जैनासोबत फ्रान्समध्ये राहतो पण सध्या तो कतारच्या दौऱ्यावर आहे. उमरने सांगितले की, वडिलांनी एकदा सांगितले होते की, अल्लाहने त्यांना मुलगा म्हणून निवडले आहे जेणेकरुन ते त्यांचे कार्य चालू ठेवू शकेल.

Al-Qaeda
Chhattisgarh: पुन्हा श्रद्धा वालकर.. बँकेत काम करणाऱ्या मुलीला बॉयफ्रेंडने जंगलात नेऊन मारलं..

२६-११ हल्ल्या आगोदर उमरने अफगाणिस्तान सोडले

कतारच्या दौऱ्यावर असताना उमरने सांगितले की, वडिलांसोबत घालवलेल्या आठवणीना मी विसरायचा प्रयत्न करत आहे.

'डोळ्यांसमोर कुत्र्यांवर रासायनिक वेपनची चाचणी '

उमरने सांगितले की, माझ्या वडिलांनी माझ्या डोळ्यांसमोर पाळीव कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांच्या चाचण्या केल्या होत्या.

Al-Qaeda
Delhi Crime: श्रद्धा हत्येसारखी दुसरी घटना : नवऱ्याची हत्या करून तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, महिलेला अटक

'माझ्या वडिलांना सांगितले की मी दहशतीसाठी बनलेलो नाही'

उमरने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याला कधीही अल कायदामध्ये सामील होण्यास सांगितले नाही. पण त्यांचे काम पुढे नेण्यासाठी अल्लाहने मला त्यांचा मुलगा म्हणून निवडले आहे, असे ते मला सांगत. मी दहशतीच्या जगासाठी बनलेलो नाही, असे मी त्यांना सांगितल्यावर ते निराश झाले होते.

जेव्हा उमरला विचारले की त्यांच्या वडिलांनी त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड का केली? यावर उमर म्हणाला की, मला माहीत नाही. कदाचित मी जास्त हुशार होतो, म्हणूनच कदाचित मी आज जिवंत आहे. उमरची पत्नी जैना सांगते की ती त्याची जीवनसाथी आहे आणि तो खूप वाईट आघातातून गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.