200 Crore Cash: काँग्रेसच्या खासदारावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश; PM मोदींच्या ट्विटची चर्चा

काँग्रेसचे खासदाराच्या विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागानं शुक्रवारी छापेमारी केली.
Cash
Cash
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदाराच्या विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागानं शुक्रवारी छापेमारी केली. या छाप्यांमध्ये मोठं घबाड हाती लागलं आहे. तब्बल २०० कोटी रुपयांची कॅश या ठिकाणांवर आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. झारखंड आणि ओडिशातील कंपन्यांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. (Over Rs 200 crore in cash and counting Congress MP raided in Jharkhand Odisha)

झारखंड, ओडिशात छापेमारी

एएनआयच्या माहितीनुसार, बलदेव साहू इन्फ्रा प्रा. लि.च्या बौद्ध डिस्टिलरीज या कंपनीच्या झारखंड आणि ओडिशा इथल्या प्लान्टवर इन्कम टॅक्स विभागानं ही छापेमारी केली आहे. काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीची ही कंपनी आहे. (Marathi Tajya Batmya)

Cash
Mahua Moitra: निलंबनाच्या कारवाईनंतर महुआ मोइत्रांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लोकसभा म्हणजे...

कॅशची मोददाद सुरु

दरम्यान, या ठिकाणांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कॅशची अद्याप मोजदाद सुरु आहे, त्यामुळं या रक्कमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Cash
Mahua Moitra: निलंबनाच्या कारवाईनंतर महुआ मोइत्रांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लोकसभा म्हणजे...

मोदींचं ट्विट चर्चेत

इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दैनिक भास्करच्या पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीचा फोटो शेअर करत पंतप्रधानांनी म्हटलं की, देशवासियांनो या नोटांचा ढीग पाहा आणि या लोकांच्या इमानदारीची भाषणं ऐका. जनतेकडून जे लुटलं आहे, त्यातील एक-एक रुपया परत द्यावा लागेल. ही मोदींची गॅरंटी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.