इंधन दरवाढीचे खापर युद्धावर नको - पी. चिदंबरम्

पी. चिदंबरम: मंदावलेला विकासदर ही मोदी सरकारची ओळख
p Chidambaram Fuel price hike russia ukraine war Udaipur
p Chidambaram Fuel price hike russia ukraine war Udaipursakal
Updated on

उदयपूर (राजस्थान) : महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक स्थितीवर काँग्रेसने मोदी सरकारवर आज हल्ला चढवला. मंदावलेला विकासदर मागील आठ वर्षात मोदी सरकारची ओळख बनली आहे, अशी तोफ माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी केंद्र सरकारवर डागली. तसेच, इंधन दरवाढीचे खापर सरकारने युक्रेन-रशिया युद्धावर फोडू नये, असे खडे बोलही सुनावले. हॉटेल ताज अरावलीमध्ये सुरू असलेल्या चिंतन शिबिरात पत्रकारांशी चिदंबरम् यांनी संवाद साधला.

आज देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली आहे. वाढत्या महागाईसाठी मोदी सरकार जबाबदार असून महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. १९९१ मध्ये काँग्रेस सरकारने आर्थिक उदारीकरणाच्या नव्या युगाची सुरवात केली होती. त्यानंतर आता ३० वर्षांनी आता जागतिक आणि देशांतर्गत विकास लक्षात घेऊन पुन्हा एकदा आर्थिक धोरणांमध्ये बदल करण्याची गरज भासत आहे, असे ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेवर काँग्रेस कोणत्या उपाययोजना सुचविणार आहे, यावर विचारले असता चिदंबरम् यांनी सरकार विरोधकांचे ऐकते काय, असा सवाल केला. राज्यांची केंद्राकडे मार्च अखेर ७८७०४ कोटी रुपयांची थकबाकी असून अद्याप ती मिळालेली नाही, याकडे लक्ष वेधताना चिदंबरम् म्हणाले, की कोरोनानंतर देशाची प्रगती थांबली आहे. २०२२-२३ च्या आर्थिक विकासदराचा अंदाज मागील पाच महिन्यांमध्ये वेळोवेळी घटविण्यात आला असून यामुळे महागाई वाढली आहे.

शेतकरीहित विरोधी सरकार: चिदंबरम

महागाईच्या मुद्द्यावर जनमत संघटित करण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरल्याबद्दल छेडले असता पी. चिदंबरम यांनी काँग्रेसच्या अपयशाची कबुली दिली. परंतु हे अपयश माध्यमांचेही असल्याचा चिमटा काढला. गव्हाची निर्यात थांबविण्याच्या आदेशावरही टीका केली. सरकार पुरेसा गहू खरेदी करण्यात अपयशी ठरले. हे शेतकरीविरोधी पाऊल आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे नसल्याने या निर्णयाबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.