Padma Bhushan theft: अजब चोरीची गजब गोष्ट; 'पद्मभूषण' चोरला, विकायला नेला, पण सोनाराच्या हुशारीमुळे....

Padma Bhushan stolen: पंजाब यूनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरु जीसी चटर्जी यांचा पद्मभूषण पुरस्कार चोरी झाला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे
arreted
arretedEsakal
Updated on

नवी दिल्ली- पंजाब यूनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरु जीसी चटर्जी यांचा पद्मभूषण पुरस्कार चोरी झाला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जोडपे पुरस्कार विकण्यासाठी ज्वेलर्स शॉपमध्ये आले होते. याप्रकरणी त्यांना अटक करण्याचं कळतंय.

श्रवण कुमार (33), हरि सिंह (45), रिंकी देवी (40), वेद प्रकाश (39) आणि प्रशांत बिस्वास (49) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मदनपूर खादरचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. प्रशांत बिस्वास हा ज्वेलरी शॉप चालवतो. (Padma Bhushan stolen Couple sold in market jeweler)

arreted
Nagpur Crime: २१ जणांनी घरात घुसून केली होती इसमाची हत्या, मुख्य आरोपीला सापळा रचून अटक

मंगळवारी रिंकी देवी, वेद प्रकाश आणि हरि सिंह हे पुरस्कार विकण्यासाठी ज्वेलर्स शॉपमध्ये आले होते. ज्वेलर्स शॉप मालक दलीपने पुरस्कार घेतला नाही. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, पण तोपर्यंत आरोप फरार झाले होते. त्यानंतर पोलीस अॅक्टिव मोडमध्ये आले. एका एसीपी अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वामध्ये टीम स्थापन करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. यातून आरोपींना शोधण्यास मदत झाली.

तीन आरोपींची ओळख झाली होती. यात हरि सिंह, रिंकी देवी आणि प्रकाश बिस्वास यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु करण्यात आली. यात कळालं की श्रवण कुमार याने पुरस्कार चोरला होता. त्यालाही अटक करण्यात आलीये.

arreted
Crime News: लग्नाच्या प्रलोभनाने तरुणीला लाखोंचा गंडा; मैट्रोमोनियल साईटवरुन कसा घडला झाला प्रकार?

श्रवण हा जीसी चटर्जी यांचे नातू समरेश चटर्जी यांच्याकडे मेडिकल मदतनीस म्हणून काम करतो. समरेश चटर्जी यांची तब्येत टीक नसल्याने श्रवण त्यांना मदत करतो. ते एकटेच घरी राहतात. याचा फायदा घेऊन त्याने पुरस्कार चोरला. त्याने पुरस्कार विकण्यासाठी हरि सिंह, रिंकी देवी, वेद प्रकाश यांना दिला होता. पोलिसांनी पुरस्कार जप्त केला आहे.

कोण आहेत जीसी चटर्जी?

जीसी चटर्सी यांना पद्मभूषण भारत सरकारकडून देण्यात आला आहे. चटर्जी पंजाब आणि राजस्थान यूनिव्हर्सिटीचे कुलगुरु, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि नॅशनल बुक स्ट्रस्टचे अध्यक्ष होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.