अफगाणकडे जाणारे भारताचे पाच हजार ट्रक का अडकलेत पाक सीमेवर? काय आहे हे प्रकरण?

अफगाणकडे जाणारे भारताचे पाच हजार ट्रक का अडकलेत पाक सीमेवर? काय आहे हे प्रकरण?
Updated on

नवी दिल्ली: गेल्या ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. मात्र, तालिबानच्या या सत्तेमुळे अफगाणिस्तानचं आबाळ व्हायची वेळ आली आहे. दहशतवादी म्हणून गणल्या गेलेल्या तालिबानने साऱ्या देशावर ताबा मिळवला असला तरी शासन कसं चालवायचं, याची तसूभरही कल्पना नसणारा तालिबान आता अफगाणी लोकांच्याच जीवावर उठला आहे. आर्थिक आघाड्यांवर अफगाणिस्तान देश सध्या रसातळाला निघाला असून सामान्य लोकांच्या दोनवेळच्या जेवणाची सुद्धा पंचायत होत आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानला असलेली मदतीची गरज लक्षात घेता भारताने आता धान्य पाठवण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, भारताच्या या मदतीच्या आड आता पाकिस्तान आला आहे. भारताने अनेकदा अफगाणिस्तानला आवश्यक ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं आहे.

अफगाणकडे जाणारे भारताचे पाच हजार ट्रक का अडकलेत पाक सीमेवर? काय आहे हे प्रकरण?
चीनच्या उलट्या बोंबा, कोरोना पसरवण्यासाठी 'हे' 3 देश जबाबदार

अफगाणिस्तानला मदत म्हणून भारताने ५० हजार मेट्रीक टन गहू पाठवण्याची तयारी केली आहे. मात्र, हे धान्य अफगाणिस्तानपर्यंत नेण्यासाठी करावं लागणारी वाहतूक ही पाकिस्तानमधून होणार आहे. गहू ट्रकमधून अफगाणिस्तानमध्ये पाठवायचा असल्याने हे ट्रक पाकिस्तानमधून जाऊ द्यावेत अशी विनंती भारताने पाकिस्तानाी शासनाकडे केलीय. आधीच अडचणीत असलेल्या अफगाणी नागरिकांची हिवाळ्यामध्ये धान्य तुटवडा होऊ आणखी दयनीय अवस्था होऊ नये म्हणून चीन, टर्कीसारख्या देशांनीही मागील आठवड्यापासून अफगाणिस्तानमध्ये धान्य पाठवण्यास सुरुवात केलीय.

मागच्या महिन्यात पाकिस्तानला विनंती

अफगाणिस्तामध्ये हे धान्य पाठवता यावं, यासाठी सहकार्य करण्यासंदर्भात भारताने पाकिस्तानकडे मागील महिन्यामध्ये एक विनंती केली होती. ही वाहतुक जमीनीवरुन म्हणजेच रस्ते वाहतुकीच्या मार्गाने व्हावी आणि त्यासाठी भारताचे ट्रक पाकिस्तानमार्गे अफगाणकडे जाऊ द्यावेत, अशी मागणी भारताने केली आहे. मात्र, अद्यापही पाकिस्तानकडून याबाबतचं उत्तर आलेलं नाहीये. भारतामधील अधिकाऱ्यांना पाकिस्तानकडून लवकर उत्तर येईल अशी अपेक्षा आहे. अफगाणिस्तानच्या मदतीसाठी हे धान्य पाठवलं जाणार असल्यानं पाकिस्तान भारताला सहकार्य करेल, अशी आशा आहे.

अफगाणकडे जाणारे भारताचे पाच हजार ट्रक का अडकलेत पाक सीमेवर? काय आहे हे प्रकरण?
पोटनिवडणुकीच्या निकालाचा भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांना झटका

काय आहे पाकिस्तानचं म्हणणं?

ही मदत अफगाणिस्तानकडे लवकरात लवकर रवाना व्हावी यासाठी भारताने पाकिस्तानकडे विनंती अर्ज केला आहे. मात्र धान्य असणाऱ्या ट्रकची संख्या आणि त्यामधील माल पाहता रस्ते योग्य आहेत की नाही याची चाचपणी करावी लागणार असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पाकिस्तानने यासाठी संमती दिली नाहीये. जर भारतीय ट्रकना परवानगी मिळाली नाही तर वाघा अटारी सीमेजवळ भारताचा सर्व गहू ट्रकमधून उतरवून तो पाकिस्तानी ट्रकमध्ये भरुन पाठवावा लागेल. मात्र हे काम अर्थातच जिकरीचं ठरणार आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानमधील लोकांना मदत करण्यासाठी पाकिस्तान भारताचं सहकार्य करेल अशी अपेक्षा भारतीय अधिकाऱ्यांना असल्यानेच त्यांनी ही विनंती केलीय. पाकिस्तान करत असलेला विलंब ही अफगाणिस्तानला मदत पोहोचवण्यास अधिक उशीर करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.