नवी दिल्ली: कागदपत्रं आणि नकाशे (Maps) त्याने बुटामध्ये भरले होते. पाकिस्तानी सैन्यातील (Pakistan army) हा २० वर्षाचा तरुण लष्करी अधिकारी सियालकोट सेक्टरध्ये तैनात होता. मार्च १९७१ मध्ये कसाबसा तो भारताच्या हद्दीत (India-pakistan war) दाखल झाला. त्यावेळी पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी लष्कराकडून सर्वसामान्य जनतेवर अत्याचार (Atrocities) सुरु होते. नरसंहारची त्यांनी योजना आखली होती. हा तरुण भारतात दाखल झाला, त्यावेळी त्याच्या पाकिटात २० रुपये होते आणि त्याच्याकडे पाकिस्तानी सैन्याची माहिती होती.
भारताच्या हद्दीत शिरताच आपल्या सैन्याने या तरुणाला पकडलं. सुरुवातीला हा तरुण पाकिस्तानचा हेर वाटला. लवकरच त्याला पठानकोट येथे नेण्यात आले. तिथे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याने त्याच्याजवळ असलेली पाकिस्तानी लष्कराच्या तैनातीची कागदपत्र दाखवल्यानंतर ही बाब गंभीर असल्याचं भारतीय सैन्य अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्या तरुण पाकिस्तानी सैनिकाला दिल्लीला पाठवण्यात आलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
पूर्व पाकिस्तानात परतण्याआधी काही महिने तो दिल्लीतील सेफ हाऊसमध्ये राहिला. पाकिस्तानी लष्कराचा सामना करण्यासाठी त्याने मुक्ती बाहिनीला प्रशिक्षण दिले. वयाच्या विशीत भारतात दाखल झालेल्या त्या तरुणाचं नाव होतं, लेफ्टनट कर्नल काझी सज्जाद अली झहीर. त्यांनी बांगलादेश लष्करात अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.
पाकिस्तानात माझ्या नावाने आजही मृत्यूदंडाची शिक्षा प्रलंबित असल्याचे काझी सज्जाद अभिमानाने सांगतात. १९७१ साली बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात , लेफ्टनट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांनी भारताची मदत केली होती. बांगलादेशमध्ये कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांना भारत सरकारने पद्म श्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. १९७१ च्या युद्धात भारतासाठी त्यांनी जे योगदान दिले, त्यासाठी कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांना पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.