पाकमध्ये जिन्नांचा पुतळा उडवला बॉम्बने; दहशतवाद्यांनी घेतली जबाबदारी

पाकमध्ये जिन्नांचा पुतळा उडवला बॉम्बने; दहशतवाद्यांनी घेतली जबाबदारी
Updated on

लाहोर: पाकिस्तानमधील ग्वादर शहरामध्ये बलूच बंडखोरांनी रविवारी बॉम्बहल्ला करुन देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या पुतळ्याला उद्ध्वस्त केलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी बंदी असलेल्या बलूच लिबरेशन फ्रंटने घेतली आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हवर जूनमध्ये प्रस्थापित करण्यात आलेली ही प्रतिमा रविवारी सकाळी बलूच बंडखोरांकडून विस्फोटक लावून नेस्तनाबूत करण्यात आली. रिपोर्टनुसार, या स्फोटामध्ये ही मूर्ती पुर्णपणे नष्ट झाली आहे.

पाकमध्ये जिन्नांचा पुतळा उडवला बॉम्बने; दहशतवाद्यांनी घेतली जबाबदारी
पुरुषांनी दाढी करू नये, तालिबान्यांचा अजब फतवा

प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी

बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेली अतिरेकी संघटना बलूच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ता बबगर बलूचने ट्विटरवर ट्विट करुन या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. बीबीसी उर्दूने ग्वादरचे उपायुक्त मेजर (निवृत्त) अब्दुल कबीर खान यांच्या हवाल्याने सांगितलं की या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी सुरु आहे.

पाकमध्ये जिन्नांचा पुतळा उडवला बॉम्बने; दहशतवाद्यांनी घेतली जबाबदारी
जर्मनीत अँजेला मर्केल यांच्या पक्षाला धक्का; सोशल डेमोक्रेटस आघाडीवर

पर्यंटक म्हणून आले होते बंडखोर

माजी मेजर अब्दुल कबीर खान यांनी म्हटलं की, सर्व बंडखोर पर्यटक म्हणून आले होते. त्यांनी विस्फोटके लावून जिन्नाची प्रतिमा नष्ट केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कुणालाही अटक झालेली नाहीये, मात्र एक दोन दिवसांत संपूर्ण तपास केला जाईल. लवकरच दोषींना अटक केली जाईल.

2013 मध्येही जिन्नांच्या इमारतीला उडवलं

याआधी 2013 मध्ये, बलूच बंडखोरांनी जियारतमध्ये जिन्नांच्या 121 वर्षे जुनी इमारत विस्फोटकांनी उडवून लावली होती. त्यामुळे या इमारतीमध्ये भीषण आग लागली होती, जी जवळपास 4 तास धगधगत होती. या इमारतीमध्येच जिन्नानी आपले शेवटचे दिवस घालवले होते. या इमारतीला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.