Tiger Memon Photo: अखेर ३० वर्षांनी मिळाला टायगर मेमनचा फोटो, मोस्ट वॉन्टेड डॉनच्या पत्त्याचा सुद्धा केला जातोय दावा

मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी टायगर मेमनला पाकिस्तानने आश्रय दिला आहे.
Tiger Menon Photo
Tiger Menon PhotoEsakal
Updated on

मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी टायगर मेमनला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. त्याचा ठावठिकाणा कराचीत आहे, त्याचा पत्ता माहीत असल्याचा दावा 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे. कराची येथील संरक्षित परिसरात बांधलेल्या एका बंगल्यात तो राहतो. बंगल्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीने वेढलेला आहे.(Marathi Tajya Batmya)

टायगर मेमनचे खरे नाव इब्राहिम मेमन आहे. अंडरवर्ल्डमध्ये आल्यानंतर त्याचे नाव इब्राहिमवरून बदलून टायगर झाले. त्याचे कुटुंब मुंबईचे होते. टायगरचे वडील अब्दुल रज्जाक मेनन हे एक व्यापारी होते. ते मुंबईतील भिंडी बाजार परिसरात पत्नी हनीफा आणि सहा मुलांसह राहत होते. त्याच्या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा इब्राहिम उर्फ ​​टायगर मेमन 80 च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आला आणि यामध्ये अडकला. टायगर मेमनचा दुसरा भाऊ याकूब मेमन चार्टर्ड अकाउंटंट होता. तोही यामध्ये अडकला. टायगरचा काळा पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवणे हे याकूबचे काम होते. (Marathi Tajya Batmya)

Tiger Menon Photo
Suspended MP's : 'त्या' खासदारांना संसदेच्या लॉबीमध्ये देखील जाता येणार नाही, लोकसभा सचिवालयाचा कडक आदेश

12 एप्रिल 1993 रोजी स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीपासून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले. या मालिकेतील स्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 700 लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम होता, जो फरार झाला होता आणि आता तो पाकिस्तानमध्ये आश्रय घेत आहे. टायगर हा दाऊदचा खास माणूस होता. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर तोही त्याच्यासोबत दुबईलाही फरार झाला होता.(Marathi Tajya Batmya)

Tiger Menon Photo
Jagdeep Dhankhar : मी सुद्धा २० वर्षांपासून असाच अपमान सहन करतोय... नकलेवरून मोदींनी केला उपराष्ट्रपतींना फोन

त्याचा भाऊ याकूब मेमनला 1994 मध्ये दिल्लीतून अटक करण्यात आली होती. टायगरचे वडील रज्जाक, आई हनीफा, भाऊ इसा आणि युसूफ, याकूबची पत्नी राहिना, मोठ्या भावाची पत्नी रुबिना यांनाही मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरवण्यात आले होते. मुंबईतील विशेष टाडा न्यायालयाने 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल नोव्हेंबर 2006 मध्ये दिला होता. एकूण 600 जणांची साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात 100 जण दोषी सिद्ध झाले.

दोषींमध्ये याकुब मेमन, युसूफ मेमन, इसा मेमन आणि रुबिना मेमन यांच्या नावांचाही समावेश आहे, तर मुख्य आरोपी टायगर मेमन फरार होता. मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागाबद्दल न्यायालयाने याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली. 30 जुलै 2015 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याला फाशी देण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

Tiger Menon Photo
Mimicking Video: उपराष्ट्रपतींची नक्कल करणं तृणमूलच्या खासदाराला पडलं महागात; तक्रार दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.