भारताच्या श्रीनगर-शारजाह विमान उड्डाणावर 'पाक'चा आक्षेप

Srinagar To Sharjah Flight
Srinagar To Sharjah Flightesakal
Updated on
Summary

पाकिस्तानचा भारताविरुध्दचा द्वेष पुन्हा एकदा समोर आलाय.

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानचा भारताविरुध्दचा द्वेष पुन्हा एकदा समोर आलाय. श्रीनगर ते शारजाह दरम्यान सुरू झालेल्या फ्लाइटमुळं पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होतोय. पाकिस्ताननं आपल्या हवाई हद्दीतून या विमानाच्या उड्डाणावर बंदी घातलीय. मंगळवारी पाकिस्ताननं श्रीनगर ते शारजाहला जाणाऱ्या विमानाला आपली हवाई हद्द वापरण्यापासून रोखल्यानं विमानाला माघारी परतावं लागलंय. यावरुन भारतात पुन्हा पाकिस्तानविरुध्द संतापाची लाट पसरलीय.

काश्मीरमधून उड्डाण केल्यामुळं पाकिस्तानमध्ये खळबळ उडालीय. याआधीही काश्मीरमधून उड्डाण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांना त्यांचं हवाई क्षेत्र वापरण्यापासून रोखलं होतं. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केलाय. ते म्हणाले, हवाई क्षेत्राचा वापर करू न देणं हे दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. 2009-10 मध्ये श्रीनगरहून दुबईला जाणार्‍या एअर इंडिया एक्सप्रेसलाही पाकिस्ताननं असंच केलं होतं. मला अपेक्षा होती, की GoFirst Air विमानाला हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी देणं हे संबंध सुधारण्याचं लक्षण आहे, परंतु तसं झालं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केलीय.

Srinagar To Sharjah Flight
अफगाणिस्तान : अंदाधुंद गोळीबारात तालिबानचा टॉप कमांडर ठार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 23 ऑक्टोबर रोजी श्रीनगर-शारजाह विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवला होता. हे उड्डाण गो फर्स्ट एअरनं सुरू केलंय. श्रीनगर ते शारजाहपर्यंत थेट आंतरराष्ट्रीय उड्डाण आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरू करणारी GoFirst ही पहिली विमान कंपनीय. GoFirst श्रीनगर आणि शारजाह दरम्यान आठवड्यातून चार उड्डाण करत असते. एअरलाइननं एका निवेदनात म्हटलंय, की शारजाहला थेट फ्लाइट सुरू केल्यानं श्रीनगर आणि यूएई दरम्यान व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यासाठी भारताकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांमध्ये केला जात आहे. याप्रकरणी पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी इम्रान सरकारला घेरलंय.

Srinagar To Sharjah Flight
काबुलमध्ये रुग्णालयासमोर आत्मघाती हल्ला; 15 जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.