Seema Haider: प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आली खरी; पण पुढे काय होणार? इथलंच नागरिकत्व मिळणार की...

सध्या सीमा दावा करत आहे की ती आता पुन्हा पाकिस्तानात जाणार नाही. पण सीमा आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
Seema Haider Pakistan
Seema Haider PakistanSakal
Updated on

पाकिस्तानची सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडाचा सचिन मीना यांची प्रेमकहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या दोघांचं PUBG खेळताना एकमेकांवर प्रेम जडलं. हे प्रेम इतकं वाढत गेलं की सीमा हैदर आधी दुबई आणि नंतर नेपाळला आली आणि तिथून ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा गावात पोहोचली. या महिन्याच्या चार तारखेला सचिन आणि त्याच्या वडिलांसह सीमालाही पोलिसांनी अटक केली आहे. पण त्यानंतर सगळ्यांचीच जामिनावर सुटका झाली.

सध्या सीमा आपल्या प्रियकरासोबतच राहत आहे. ती दावा करत आहे की ती आता पुन्हा पाकिस्तानात जाणार नाही. पण सीमा आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. हे प्रकरण काय आहे, पोलिसांनी अटक का केली, पुढे सीमाचं काय होईल, या सगळ्याविषयी जाणून घ्या.

Seema Haider Pakistan
Gadar 2 Seema Haider: प्रेमासाठी पाकीस्तानातून भारतात आली सीमा हैदर, गदर 2 चे दिग्दर्शक म्हणतात...

कोण आहे सीमा हैदर?

सीमा हैदर एक पाकिस्तानी महिला आहे. ती सिंध प्रांतातली रहिवासी आहे. २७ वर्षीय सीमाचं पूर्ण नाव सीमा गुलाम हैदर असं आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीमा आपला पती गुलाम हैदर याच्यासोबत कराचीमध्ये राहत होती. तिने दावा केला आहे की तिच्या नवऱ्याने तिला फोनवरुन घटस्फोट दिला होता आणि आता ते दोघे संपर्कात नाहीत.

सीमाचा पूर्वाश्रमीचा पती गुलाम हैदर सध्या सौदी अरबमध्ये काम करत आहे. सीमा सध्या ग्रेटर नोएडा इथल्या रबूपुरामध्ये राहणाऱ्या सचिन मीनासोबत राहत आहे. सीमाने याच वर्षीच्या सुरुवातीला सचिनसोबत नेपाळच्या काठमांडूमध्ये दुसरं लग्न केलं होतं आणि हिंदू धर्म स्विकारला होता.

Seema Haider Pakistan
Seema Haidar : "सीमा हैदर परत आली नाही तर भारताचा नाश... 26/11 प्रमाणे..."; मुंबई पोलिसांना धमकी

भारतात कशी आली सीमा आणि अटक कधी झाली?

सचिन आणि सीमा या दोघांमध्ये PUBG गेम खेळताना ओळख आणि मैत्री झाली. कोरोना काळात व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्यातली जवळीक आणखी वाढली. यानंतर सीमा १३ मे रोजी नेपाळकडून पाकिस्तानातून भारतात आली होती. तिच्यासोबत तिची चार मुलंही आली आहे. हे सगळे रबुपुरातल्या आंबेडकर नगरमध्ये घर भाड्याने घेऊन सचिनसोबत राहत होती. पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागताच सीमा आपल्या चार मुलांसह आणि सचिनसह फरार झाली. पोलिसांच्या तुकडीने या सर्वांना ४ जुलै रोजी हरियाणामधल्या वल्लभगढ भागातून पकडलं.

Seema Haider Pakistan
Seema Haider : धर्म बदलल्यानंतर पाकिस्तानी सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळेल का, कायदा काय सांगतो?

कोणत्या आरोपाखाली पोलिसांनी सीमाला अटक केली?

नोएडा पोलिसांना सचिनच्या एका शेजाऱ्याकडून त्यांच्या लग्नाबद्दल तक्रार मिळाली. त्यानंतर या दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. सीमावर आपला प्रियकर सचिनच्या सोबत राहण्यासाठी व्हिसा नसताना भारतात प्रवेश करण्याचा आरोप करण्यात आला होता.

सीमावर विदेशी अधिनियम, १९४६ च्या कलम १४ अंतर्गत आरोप करण्यात आला होता. जेवढ्या दिवसांच्या मुदतीचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे त्याहून अधिक कालावधीसाठी जर भारतात राहिलं तर हे नियमाचं उल्लंघन मानलं जातं आणि याची शिक्षा म्हणून कारवाईही केली जाते. पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूदही आहे.

अटकेनंतर सीमा आणि अन्य आरोपींना नोएडाच्या लुक्सर जेलमध्ये नेण्यात आलं. पण ७ जुलै रोजी त्या सर्वांना जामीन मिळाला. या शिवास सीमाला ३०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच कोर्टाने हे प्रकरण सुरू असेपर्यंत सीमा आपली राहण्याची जागा बदलू शकत नाही, अशी अट घातली आहे. या जोडप्याला दररोज कोर्टात हजेरी लावणंही अनिवार्य आहे. शिवाय जामिनांच्या अटीनुसार, सीमा कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू शकत नाही.

सीमाला आता पाकिस्तानात परत जाण्याची इच्छा नाही. तिचं असं म्हणणं आहे की जर ती पाकिस्तानात परत गेली तर तिला मारून टाकण्यात येईल. पण आता सीमाचं पुढे काय होईल?

सीमाला भारतीय नागरिकत्व मिळू शकेल का?

भारतीय कायद्यानुसार, सीमा हैदर एक अवैध प्रवासी आहे. अवैध प्रवासी म्हणजे अशी परदेशी व्यक्ती जी पासपोर्ट किंवा व्हिसा अशा कोणत्याही वैध कागदपत्रं आणि परवान्यांशिवाय देशात प्रवेश करते. तसंच या वैध कागदपत्रांसह प्रवेश करणारा व्यक्ती पण जर त्याची व्हिसाची मुदत संपली असेल तरीही त्या व्यक्तीला अवैध मानलं जातं. विदेशी अधिनियम आणि पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० नुसार अवैध प्रवाश्यांना कैद किंवा निर्वासित केलं जाऊ शकतं. 

नागरिकता मिळण्याच्या मुद्द्यावर अमर उजालाशी बोलताना सर्वोच्च न्यायालयातले वकील विराज गुप्ता म्हणाले, “सीमा सध्या अवैध रुपाने भारतात आली आहे. नियमानुसार तिला नागरिकत्वासाठी अर्ज द्यावा लागेल. पोलिसांच्या तपासानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरुन केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल. नागरिकता देणं किंवा न देणं केंद्र सरकारचा विशेषाधिकार आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवाधिकार या मुद्द्यांना समोर ठेवून निर्णय घेतला जातो. अवैध प्रवासी शरण येण्यासाठी नागरिकतेसाठी अर्ज करू शकतो. जर हा अर्ज नाकारला गेला तर त्यांना पुन्हा पाकिस्तानला पाठवण्यात येऊ शकतं. शिवाय त्यांना अवैध पद्धतीने देशात येणे आणि खोटं आधार कार्ड बनवणं या आरोपांमध्ये शिक्षा होऊ शकते.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.