Pakistan News : पाकिस्तानात भारतच्या सात महिन्यात सात शत्रूंचा खात्मा! या हत्यांमागे नेमकं कोण?

फाईल फोटो
फाईल फोटो
Updated on

पाकिस्तानातील कराची येथे मौलाना रहीम उल्लाह तारिक याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. रहीम उल्लाह हा दहशतवादी मौलाना मसूद अझहरशी अगदी जवळचा संबध होता आणि अनेक मोठ्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता.

कराचीतील ओरंगी येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. कराची पोलिसांनी या घटनेला टार्गेट किलिंग आणि दहशतवादी कृत्य म्हटले आहे.

त्याचबरोबर भारतासाठी ही दिलासादायक बाब असून भारतावर हल्ल्याच्या पाठिमागे हात असलेल्या दहशतवाद्याची हत्या होण्याची या वर्षातील ही तिसरी घटना आहे. तर गेल्या ७ महिन्यांतील ही सहावी घटना आहे ज्यामध्ये एखाद्या जिहादी संघटनेचा दहशतवादी किंवा खलिस्तानी मारला गेला आहे.

काही दिवसांपूर्वी खैबर पख्तुनख्वामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कर कमांडर अकरम गाझीलाही ठार केले होते. यापूर्वी २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमधील सुजवां येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ख्वाजा शाहिद याचेही अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी नियंत्रण रेषेजवळ त्याचा डोके नसलेला मृतदेह सापडला होता.

मौलाना रहीम उमुल्ला तारिक यांच्या हत्येमागे स्थानिक अतिरेकी आणि वर्चस्वाची लढाई कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

फाईल फोटो
Ind vs Nz Semi Final : हिशेब चुकते करण्याची वेळ! अपराजितच्या कवचकुंडलांमुळे भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा वरचढ

कराची पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी रहिम उल्लाहला जवळून गोळ्या घातल्या आणि ते घटनास्थळावरून सहज पळून गेले. यामुळे कराचीच्या ओरंगीबद्दल त्यांना पूर्ण माहिती होती, हे स्पष्ट आहे. यात तारिक याचा जागीच मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भारतविरोधी एका कार्यक्रमाला जात असताना हा हल्ला करण्यात आला. यावेळी त्याची हत्या करण्यात आली.

यापूर्वी मारला गेलेला अकरम गाझी भारताविरुद्ध दहशतवाद्यांची भरती करण्याकडेही लक्ष देत होता. त्याने २०१८ ते २०२० या काळात लष्करमध्ये मोठ्या संख्येने दहशतवाद्यांची भरती केली होती.

फाईल फोटो
Deepfake Scam : मित्राचं रुप घेऊन केला व्हिडिओ कॉल, डीपफेकच्या मदतीने हजारोंचा गंडा! कशी झाली फसवणूक?

लष्करचा आणखी एक टॉप कमांडर रियाज अहमद यांची पीओके च्या रावलकोट मध्ये हत्या झाली होती. तसेच लष्करच्या ऑपरेशन आणि भरतीचे काम पाहत होता. त्याव्यतिरिक्त मे मध्ये भारताचा मोस्ट वाँटेड आणि खलिस्तानी कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंह पंजावर याची देखील हत्या झाली होती. पंजावर याला लाहोरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या घालण्यात आल्या. याशिवाय लष्करचा आणखी एक दहशतवादी मौलाना जियाउर रहमान आणि मुफ्ती कैसर यांची देखील हत्या करण्यात आली आहे.

फाईल फोटो
Diwali Pollution: लक्ष्मीपूजनाला फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी 212 टक्के; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

कोण कधी मारला गेला?

सहा मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सचा म्होरक्या परमजीत सिंह पंजावर याची हत्या झाली.

१२ सप्टेंबर रोजी कराची मध्ये मौलाना रहमान मारला गेला.

३० सप्टेंबर रोजी मुफ्ती कैसर याची हत्या झाली.

१० ऑक्टोबर रोजी जैश-ए-मोहम्मद चा गहशतवादी शाहिद लतीफ याची हत्या झाली.

नोव्हेंबर महिन्यात ख्वाजा शाहिद याचं अपहरण करत हत्या करण्यात आली.

नोव्हेंबर महिन्यातच लष्कर चा दहशतवादी अकरम गाझी याची हत्या झाली.

१२ नोव्हेंबर रोजी रहीम उल्लाह तारिक याची हत्या करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.