Pakistan Tourism video man trying to discipline : पाकिस्तान दरवेळी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल होताना दिसून येते. आताही त्यांच्या टुरिझम विभागानं ऑफिशियल ट्विटरवरुन जो व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. काहींनी तर पाकिस्तानला तिखट शब्दांत सुनावले आहे.
व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लेखकांनी देखील तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपण काय करतो आहोत, तुमचे डोके तर फिरले नाही ना, जो व्हिडिओ ज्या उद्देशानं सोशल मीडियावर शेयर केला आहे तो पहिला काढून टाका. अशा शब्दांत पर्यटन खात्याला सुनावले आहे. पाकिस्तानी लोकांनी देखील त्यावरुन संताप व्यक्त केला आहे.
Also Read - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
असं काय झालं की, सगळ्यांनीच पाकिस्तानची अक्कल काढण्यास सुरुवात केली आहे, तर त्या व्हिडिओमध्ये विवाहित जोडपे दिसत आहे. ते फिरण्यासाठी एका ठिकाणी गेले आहे. तेव्हा एका केबल कारमध्ये बसल्यानंतर पतीनं त्या केबल कारची सेफ्टी पिन काढून पत्नीला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. मला जर यापुढे त्रास देणे बंद केले नाही तर मी तुला खाली ढकलून देईल. अशा शब्दांत त्यानं पत्नीला धमकी दिली आहे.
तो व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल होताच अनेकांचा संताप झाला आहे. आपल्या खात्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कुणी अशा प्रकारचे व्हिडिओ शेयर करते का, यातून त्या संबंधित खात्याला नेमके काय सांगायचे आहे असा प्रश्न त्याच देशातील प्रसिद्ध लेखक सलमान राशिद यांनी देखील प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे.
त्या व्हिडिओमधील महिला मात्र चांगलीच घाबरलेली दिसते आहे. तिला हे काय सुरु आहे हेच समजेना, पती असा का वागतो आहे यामुळे ती भांबावून गेली आहे. पाकिस्तानच्या टुरिझम खात्यानं हा व्हिडिओ आपल्या प्रमोशनसाठी वापरल्यानं त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.