Pakistani Girl In India : 'मी पाकिस्तानी आहे' ! पोलिसांसमोरच मुलीची माहिती अन् उडाली एकच खळबळ

Pakistani Girl In India
Pakistani Girl In India sakal
Updated on

Pakistani Girl In India : एका सामाजिक कार्यकर्त्यासोबत एक मुलगी पोलिस ठाण्यात गेली अन् मी पाकिस्तानी आहे असे सांगितले. यामुळे एकाच खळबळ उडाली आणि सगळेच कामाला लागले.

तर झाले असे कि, डेहराडूनच्या तरुणासोबत मुरादाबाद जीआरपी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने स्वत: पाकिस्तानी असल्याचे सांगितले. मात्र पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या सततच्या चौकशीनंतर त्या तरुणीची ओळख उघड झाली. संबंधित मुलगी मेरठची असून तिची बेपत्ता असल्याची नोंदही करण्यात आली आहे. हि मुलगी मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे.

Pakistani Girl In India
Pakistan : पाकिस्तानची परिस्थिती! रेल्वे आली तरी रस्त्यावरील वाहने थांबेनात; ड्रायव्हर हॉर्न वाजवून बेजार

कटघर, मुरादाबादचा रहिवासी असलेल्या सामाजिक कार्यकर्ता असलेल्या निखिलने सांगितले कि, शिमल्याहून परतत असताना डेहराडूनहून काठगोदामला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक किशोरवयीन मुलगी दिसली. यावेळी तिने सांगितले कि, ती कराचीतील कलीमाबाद येथील रहिवासी आहे. ती मुंबईत मामाच्या घरी जात आहे. ती भटकत डेहराडूनला पोहोचली आहे. यामुळे त्याने तिला पोलीस स्थानकात नेले.

पोलिसांनी सांगितले की, मुलीचे नाव बुशरा पुत्री हारुन आहे. ती मेरठ येथे राहते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. ती डेहराडूनला कशी पोहोचली? याचा तपास करण्यात येत आहे.

Pakistani Girl In India
Pakistan visas for World Cup 2023 : अखेरच्या क्षणी पाकला मिळाला व्हिसा! बाबरची टीम 'या' दिवशी येणार भारतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.