Abdul Makki : दहशतवादाविरोधात भारताची मोठी कारवाई; अब्दुल मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून केलं घोषित!

यापूर्वी दहशतवादी अब्दुल मक्कीला UNSC नं जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं.
Pakistani terrorist Abdul Rehman Makki
Pakistani terrorist Abdul Rehman Makkiesakal
Updated on
Summary

68 वर्षीय मक्की 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता.

Abdul Rehman Makki : भारतानं दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केलीये. भारतानं पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रांच्या यादीत दहशतवादी म्हणून घोषित केलंय.

यापूर्वी दहशतवादी अब्दुल मक्कीला UNSC नं जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं. जागतिक दहशतवादी घोषित झाल्यानंतर पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या मक्कीनं अल कायदाशी संबंध नाकारणारा व्हिडिओ जारी केला होता.

Pakistani terrorist Abdul Rehman Makki
India Defence Budget : भारताच्या तुलनेत चीन-पाकिस्तानचं संरक्षण बजेट किती? पाहा आकडेवारी

पाकिस्तानच्या लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात बंद असलेल्या मक्कीनं एक व्हिडिओ जारी केलाय. त्यानं अल कायदाशी माझा कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. माझ्याबाबत भारतानं चुकीची माहिती देऊन मला जागतिक दहशतवादी घोषित केलं. मी ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) कधीही भेटलो नाही. आयमान अल-जवाहरी किंवा अब्दुल्ला आझम यांनाही कधी भेटलो नाही, असं त्यानं स्पष्ट केलंय.

Pakistani terrorist Abdul Rehman Makki
Union Budget : आई देशाचा अर्थसंकल्प सादर करत होती अन् मुलगी गॅलरीत बसून तिला एकटक..

मक्की म्हणाला, UNSC नं निर्णय घेताना योग्य प्रक्रियेचं पालन केलं नाही. या सूचीबाबत कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही. भारत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना UNSC च्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी सातत्यानं करत आहे. मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीननं विरोध केला होता. मात्र, यावेळी अखेर यूएनएससीनं मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केलं.

Pakistani terrorist Abdul Rehman Makki
Modi Government : विश्वकर्मा योजनेतून मोदी सरकार 'अशी' मिळवतंय व्होट बँक; 2024 मध्ये होणार फायदा?

68 वर्षीय मक्की 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. शिवाय, 22 डिसेंबर 2000 रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही तो सूत्रधार आहे. तसंच जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये मक्कीचा हात आहे. अमेरिकन सरकारनं मक्कीवर 2 दशलक्ष बक्षीस जाहीर केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()