भारत-पाक सीमेवर महिलेची प्रसुती; बाळाच्या नावाची होतीये चर्चा

भारत पाकिस्तान वाघा-अटारी बॉर्डरवर जन्मलेल्या बाळाच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे.
baby born at Atari border
baby born at Atari border esakal
Updated on

भारत पाकिस्तानच्या सीमेवर सतत काहीना काही घडत असते. दोन्ही देशांच्या नजरा तेथील परिस्थितीकडे लागून असतात. भारत पाकिस्तान सीमेवर अटारी बॉर्डरवर घडलेल्या एका घटनेची दोन्ही देशांत चर्चा होत आहे. अटारी बॉर्डरवर एका पाकिस्तानी महिलेनं बाळाला जन्म दिलाय. विशेष म्हणजे बाळाचं जन्म सीमेवर झाला म्हणून त्याचं नाव चक्क 'बॉर्डर' असं ठेवलंय.

baby born at Atari border
बाळाच्या जन्मासाठीही शोधले जाताहेत मुहूर्त; उच्चभ्रू वर्गात रुजत आहे फॅड

निंबूबाई आणि बलम राम हे पाकिस्तानी हिंदू जोडपं काही काळापूर्वी भारतात आले होते. परंतु जवळ आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे गेल्या 70 दिवसांपासून ते अटारी सीमेवर अडकले आहेत. दरम्यान निंबूबाईनं 2 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला. सीमेवर मुलाचा जन्म झाल्यामुळे या दाम्पत्याने नवजात बाळाचे नाव 'बॉर्डर' असे ठेवले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले निंबूबाई आणि बालम राम हे अनेक दिवसांपासून इतर पाकिस्तानी नागरिकांसोबत सीमेवर राहत आहेत. येथे राहणाऱ्या 97 लोकांमध्ये 47 मुलांचा आहेत. यातील सहा मुलांचा जन्म भारतात झाला असून त्यांचे वय एक वर्षापेक्षा कमी आहे.

baby born at Atari border
गरोदरपणात घ्या हा आहार; तुमच्या व बाळाच्या आरोग्यासाठी आहे उत्तम

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे पाहून जवळच्या गावातील अनेक महिला मदतीसाठी पोहोचल्या. इतर सुविधांसोबतच स्थानिक लोकांनी आई आणि बाळासाठी वैद्यकीय व्यवस्थाही केली. निंबूबाई आणि बलम राम यांनी सांगितले की, भारत-पाक सीमेवर मुलाचा जन्म झाल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव बॉर्डर ठेवले.

बलमराम यांच्याशिवाय दुसरा पाकिस्तानी नागरिक 'लगाराम' यानेही आपल्या मुलाचे नाव 'भारत' असं ठेवले आहे. त्याच्या मुलाचा जन्म जोधपूरमध्ये 2020 मध्ये झाला होता. आपल्या भावाला भेटण्यासाठी तो जोधपूरला आला होता, पण पाकिस्तानला परत जाऊ शकला नाही. ही कुटुंबे अटारी सीमेवरील आंतरराष्ट्रीय चेकपोस्टजवळ तंबू ठोकून राहत आहेत. येथील स्थानिक लोक त्यांना दिवसातून तीन वेळा अन्न, औषधे आणि कपडे देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.