Pakistani Woman Mehvish : सीमा हैदर नंतर मेहविश, फेसबुकवरून झालं प्रेम अन् पाकिस्तानवरून पळून आली दोन मुलांची आई

मध्यंतरी प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा अधिक रंगली होती. आता सीमाच्याच पावलावर पाऊल ठेवुन मेहविश नावाची एक महिला भारतात आली आहे.
pakistani Woman Mehvish Come To India Marry Rehman From Rajasthan
pakistani Woman Mehvish Come To India Marry Rehman From Rajasthan
Updated on

प्रेम कधी कोणला कुठे होईल या काही नेम नाही. मध्यंतरी प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा अधिक रंगली होती. आता सीमाच्याच पावलावर पाऊल ठेवुन मेहविश नावाची एक महिला भारतात आली आहे. ती दोन मुलांची आई असून तिनं राजस्थानमधील तरुणाशी आपली लग्नगाठ बांधली आहे.

त्यामुळं सध्या देशभरात पाकिस्तानमधून पळून आलेल्या या मेहविशची चर्चा अधिक रंगली आहे. तर जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण? (pakistani Woman Mehvish Come To India Marry Rehman From Rajasthan )

मिळालेल्या माहितीनुसार, मेहविश तिचा विवाहित प्रियकर रहमानसोबत राहण्यासाठी राजस्थानमधील बिकानेरला पोहोचली होती. मेहविश पाकिस्तानची असली तरी तिचे कुवेत आणि सौदी अरेबियाशीही संबंध आहेत.

pakistani Woman Mehvish Come To India Marry Rehman From Rajasthan
पत्नी प्रेग्नेंट होत नव्हती, टेस्ट केली अन् पायाखालची जमीनच सरकली, FIR दाखल करण्याची वेळ

मेहविश ही कोण आहे?

मेहविश ही पाकिस्तानातील लाहोरची रहिवासी आहे. मेहविश 2 वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ती 10 वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. नंतर मेहविश आणि तिची बहीण सहिमा दोघीच इस्लामाबादमध्ये राहत होत्या. मेहविश गेल्या काही वर्षांपासून ब्युटी पार्लर चालवत आहे.

pakistani Woman Mehvish Come To India Marry Rehman From Rajasthan
परदेशात 'ब्लॅक सॉल्ट राईस'ला मागणी, भारतातील सर्वात महाग अन् पौष्टिक तांदळाबद्दल घ्या जाणून

2006 मध्ये झालं होत लग्न पण...

मेहविशने २००६ मध्ये बादामी बागच्या व्यक्तीशी लग्न केले होते. त्यांना १२ आणि ७ वर्षांचे दोन मुलगे आहेत. २०१८ मध्ये त्यांनी तलाक घेतला होता. यानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केले होते.

मग मेहविशी भारतातल्या रहमानला भेटली कशी

राजस्थानच्या चुरू येथे राहणारा रहमान हा कुवेतमध्ये ट्रान्सपोर्टर म्हणून काम करायचा. रहमान आणि मेहविशची फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर दोघं एकमेकांशी संवाद साधू लागले. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

मेहविशने 13 मार्च 2022 रोजी रहमानला प्रपोज केले. त्यानंतर दोघांनी 16 मार्च 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न केले. नंतर 2023 मध्ये मक्का येथे लग्न केले. आता मेहविश 25 जुलैला भारतात आली आहे. सध्या मेहविशला ४५ दिवसांसाठी टुरिस्ट व्हिसा मिळाला आहे.

pakistani Woman Mehvish Come To India Marry Rehman From Rajasthan
IAS coaching Center :उशीराचं शहाणपण! ३ विद्यार्थांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी पोहचले बुलडोझर; 'त्या' थारच्या ड्रायव्हरलाही अटक

त्यामुळं सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मेहविश लग्न करुन भारता आली असली तरी अनेक संशय तिच्याबद्दल व्यक्त करण्यात येत आहेत. तिची चौकशी करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस चौकशी करत असून तिच्या पासपोर्ट व्हिसाची पडताळणी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.