Kerala High Court: आई-वडीलांचं प्रेम वेगळं अन्...; मुलीला जीवनसाथी निवडण्यापासून कोणी रोखू शकत नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा

Kerala High Court: उच्च न्यायालयाने मुलींना तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही आणि न्यायमूर्ती पीएम मनोज यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
Kerala High Court
Kerala High CourtEsakal
Updated on

पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न केल्याप्रकरणी केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलांना त्यांच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच, मुलीला वडिलांच्या ताब्यातून बाहेर काढण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. याचिकाकर्ता तरुण दुसऱ्या धर्माचा असल्याने मुलीच्या वडिलांचा या नात्यावर आक्षेप असल्याचे वृत्त आहे.

उच्च न्यायालयाने मुलीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही आणि न्यायमूर्ती पीएम मनोज यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याचिकाकर्ता जर्मनीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेला विद्यार्थी आहे. प्रकल्प अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका मुलीसोबत रिलेशनमध्ये होता असा त्याचा दावा आहे.

Kerala High Court
8 तास तलावात तरंगत होती डेडबॉडी.. पोलिसांनी बाहेर ओढल्यावर म्हणाला 'अभी हम जिंदा है..!' VIDEO VIRAL

बार एंड बेंचच्या अहवालानुसार, मुलीच्या वडिलांचा मुलगा वेगळ्या धर्माची असल्याने लग्नासाठी आक्षेप होता, त्यानंतर तिला घरात ठेवण्यात आले, असे याचिकेत म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे न्यायालयाने मुलगी, तिचे वडील आणि याचिकाकर्त्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलून माहिती मिळवली होती.

Kerala High Court
Chandrakant Patil on Vinod Tawde: विनोद तावडेंना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी? चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं वक्तव्य

रिपोर्टनुसार, चर्चेदरम्यान 27 वर्षीय तरुणीने सांगितले की, तिच्या वडिलांनी तिला घरात तिच्या इच्छेविरुद्ध ठेवले होते. तिने याचिकाकर्त्यासोबत राहण्याची इच्छाही व्यक्त केली होती. यादरम्यान न्यायालयाने शफीन जहाँ विरुद्ध अशोकन केएम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला. जोपर्यंत कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या निवडीचा आदर केला पाहिजे, असेही न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

आई-वडिलांचे प्रेम किंवा काळजी एखाद्या प्रौढ मुलीच्या तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याच्या अधिकारात अडथळा आणू शकत नाही', असे खंडपीठाने म्हटले होते.

Kerala High Court
Reasi Bus Terror Attack: '...म्हणून दोन्ही मुलं वाचली', रियासी हल्ल्यातील बचावलेल्या पित्याने सांगितली 'आंखो देखा हाल'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.