भारताच्या नव्या संसद भवनाचं लवकरच उद्घाटन होणार आहे. या इमारतीच्या उद्घाटनावरुन वादाला सुरुवात झाली आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते न होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तर इंदिरा गांधींनी उद्घाटन केलं तर चालतं मग मोदींना विरोध का असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.
या सगळ्या वादादरम्यान भारताच्या प्रतिष्ठित वर्तुळाकार संसदेच्या इमारतीचा इतिहास आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
सध्याची संसदेची इमारत ही ब्रिटीश काळातली आहे. या इमारतीची रचना एडविन ल्युटन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. नवी दिल्लीचं नियोजन आणि उभारणीही याच दोघांनी केली.
सध्याच्या संसद भवनाची पायाभरणी १२ फेब्रुवारी १९२१ रोजी झाली आणि बांधकामाला सहा वर्षे लागली आणि त्यावेळी ८३ लाख रुपये खर्च आला. उद्घाटन समारंभ १८ जानेवारी १९२७ रोजी भारताचे तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते करण्यात आला. सध्याची संसद भवन इमारत ५६० फूट व्यासाची भव्य गोलाकार इमारत आहे.
इमारतीचा केंद्रबिंदू सेंट्रल हॉलची मोठी गोलाकार इमारत आहे. या केंद्रातून निघणाऱ्या तीन अक्षांवर लोकसभा, राज्यसभा आणि पूर्वीचे लायब्ररी हॉल (पूर्वी चेंबर ऑफ प्रिन्सेस) हे तीन कक्ष ठेवलेले आहेत.
भारताचे सर्वोच्च न्यायालय २८ जानेवारी १९५० रोजी उद्घाटन झाल्यानंतर तत्कालीन चेंबर ऑफ प्रिन्सेसपासून ते १९५८ मध्ये सध्याच्या इमारतीत स्थलांतरित होईपर्यंत कार्यरत होते. सेंट्रल हॉल हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री ब्रिटीशांकडून भारतीयांच्या हाती सत्ता आली. या सभागृहात भारतीय संविधानाची रचनाही करण्यात आली. ९ डिसेंबर १९४६ ते २४ जानेवारी १९५० या कालावधीत तिथं संविधान सभेची बैठक झाली.
नवीन इमारतीचे क्षेत्रफळ ६४,५०० चौरस मीटर असेल आणि अंदाजे ९७१ कोटी खर्च करून बांधलं जात आहे. नवीन इमारतीच्या बांधकामास २१ महिने लागण्याचा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.