Parliment Monsoon Session: अधिवेशनात 'समान नागरी विधेयका'चा समावेश नाहीच; पाहा संपूर्ण यादी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसाठी 'समान नागरी कायदा' प्राधान्याचा विषय राहणार आहे.
UCC Law Commission
UCC Law CommissioneSakal
Updated on

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी या अधिवेशनात कुठले विषय आणि विधेयक पटलावर मांडले जावेत यावर चर्चा झाली.

या चर्चेनंतर संभाव्य विधेयक काय असतील? याची सर्वसाधारण यादी देखील तयार करण्यात आली. हीच यादी आता समोर आली आहे. पीटीआयनं ही यादी प्रसिद्ध केली आहे. (Parliament Monsoon Session 2023 does not include Uniform Civil Bill See the full list)

UCC Law Commission
Karnataka : कर्नाटक विधानसभेत गदारोळ! अध्यक्षांकडून शिस्तभंग करणारे भाजपचे 10 आमदार निलंबित

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता एक वर्षांहून कमी कालावधी राहिला आहे. त्यासाठी भाजपनं तयारीही तयारी केली आहे. त्याअनुषंगानं केंद्रानं आता समान नागरी कायद्याचा विषय पुढे आणला आहे. (Latest Marathi News)

हा कायदा लागू करुन निवडणूका जिंकायची रणनीती भाजपनं आखली आहे. यापार्श्वभूमीवर उद्यापासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनातच समान नागरी कायद्याचं विधेयक येणार असल्याची चर्चा होती. पण विधेयकांची जी यादी समोर आली आहे त्यात या विधेयकाचा समावेश नसल्याचं दिसतंय. (Marathi Tajya Batmya)

UCC Law Commission
Mumbai Rain: दहावी-बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे; सुधारित वेळापत्रक जाहीर

त्यामुळं या अधिवेशनात जर हे विधेयक येणार नसेल तर भाजपकडून हा विषय गुंडाळण्यात आला आहे का? अशीही चर्चा यानिमित्त सुरु झाली आहे. पण ज्या अर्थी समान नागरी कायद्याची चर्चा देशभरात सुरु झाली आहे त्यावरुन भाजपनं किमान निवडणुकीची हवा तयार करण्याच्या दृष्टीनं आपला हेतू साध्य केल्याचंही बोललं जात आहे.

यादीमध्ये कोणत्या विधेयकांचा समावेश?

1) दिल्लीतील बदल्यांबाबत सुधारणा विधेयक

२) सिनेमेटोग्राफ सुधारणा विधेयक, २०१९

३) डीएनए टेक्नॉलॉजी रेग्युलेशन विधेयक, २०१९

४) पोस्टल सेवा विधेयक, २०२३

५) जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक, २०२३

या प्रमुख विधेयकांसह एकूण ३१ संभाव्य विधेयकांचा या यादीत समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.