Narendra Modi : भाजपच्या संसदीय पक्षाच्या आगामी बैठकीत मोदींचे जंगी अभिनंदन करणार

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर भाजपच्या संसदीय पक्षाच्या आगामी बैठकीत या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जंगी सत्कार व अभिनंदन करण्यात येणार आहे.
Narendra Modi
Narendra Modi Sakal
Updated on
Summary

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर भाजपच्या संसदीय पक्षाच्या आगामी बैठकीत या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जंगी सत्कार व अभिनंदन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर भाजपच्या संसदीय पक्षाच्या आगामी बैठकीत या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जंगी सत्कार व अभिनंदन करण्यात येणार आहे. दर मंगळवारी होणारी ही बैठक यावेळी बुधवारी (ता.१४) संसदेच्या बालयोगी सभागृहात होऊईल असे पक्षसूत्रांनी सांगितले.

भाजप संसदीय पक्षाची बैठक दर अधिवेशनात मंगळवारी सकाळी होते. दिल्लीत असलेले सर्व मंत्री व सत्तारूढ खासदारांना या बैठकीला व तेही वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असते. आगामी बैठक ही हिवाळी अधिवेशनातील पहिलीच बैठक असल्याने पंतप्रधान मोदी त्यात स्वपक्षीय खासदारांना कोणता ‘संदेश ‘ देणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र उद्या (ता.१३) संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा स्रणदिन असतो. दर वर्षी १३ डिसेंबरला राज्यसभेच्या प्रवेशद्वाराजवळ या हल्ल्यातील हुतात्म्यांची छायचित्रे लावून पंतप्रधान, लोकसभा-राज्यसबाध्यक्षांसह सर्वपक्षीय खासदार आदरांजली वाहतात. या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक बुधवारी घेण्याचा निर्णय झाल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.

आगामी संसदीय बैठकीत भाजपचे खासदार पंतप्रधानांचे अभिनंदन करतील. गुजरात विधानसभेत भाजपला विक्रमी विजय मिळाला त्याबद्दल पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह पंतप्रधानांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये सांगतील अशीही शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १८२ पैकी विक्रमी १५६ जागा जिंकल्या.

आपमधून इनकमिंग?

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा हा सलग सातवा विजय आहे. काँग्रेसने १७ तर आम आदमी पक्षाने (आप) ५ जागा जिंकल्या. मात्र आपचे पाचही नवनिर्वाचित आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत आहे. हे पाच आणि काही अपक्ष आमदार खरेच भाजपमध्ये गेले तर गुजरातेत भाजपच्या जागांची संख्या १६० च्या वर जाते व त्या स्थितीत भाजपचे विधानसभेतील संख्याबळ दिल्ली किंवा पंजाबमधील आपच्या विजया प्रमाणे खरोखरच भव्यदिव्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.