Parliament Breach : घुसखोरी प्रकरणानंतर मोठा खुलासा! संसदेत सुरक्षा कर्मचाऱ्यांचं शॉर्टेज; 72 ऐवजी फक्त दहाच ऑफिसर

संसदेत १३ डिसेंबर रोजी झालेल्या घुसखोरीची चौकशी सुरू आहे.
Parliament Security Breach
Parliament Security Breach
Updated on

संसदेत १३ डिसेंबर रोजी झालेल्या घुसखोरीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय पार्लमेंट सेक्युरिटी सर्व्हिस (PSS) चा देखील आढावा घेतला जात आहे. येच स्पेशल कॅडर संसदेच्या परिसरात सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात. याशिवाय संसंदेत व्हिव्हिआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी कोऑर्डिनेशनची जबाबदारी देखील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्नुसार, पीएसएस यांच्याकडे सध्या स्टाफची कमतरता आहे. तसेच सेक्युरिटीसाठी यांच्याकडे असलेली टेक्नोलॉजी देखील आउटडेटेड झालेली आहे.

रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, PSS साठी जितक्या लोकांच्या टीमला मंजूरी देण्यात आली आहे वास्तवात त्यापेक्षा खूपच कमी सदस्य या टीममध्ये आहेत. त्यामुळे एंट्री लेव्हल सिक्योरिटी पोस्टवर सर्वात कमी स्टाफ उपस्थित असतो. त्यांच्याकडूनच संसदेत दाखल होणारे नागरिक, गाड्या आणि साहित्याची तपासणी केली जाते. सुरक्षेचे हे पहिले फिल्टर लेव्हल असते. रिपोर्टनुसार लोकसभेच्या सुरक्षेसाठी ७२ सेक्युरिटी असिस्टंट ग्रेड असिस्टंट ग्रेड II ऑफिसर असणे अवश्यक असते, मात्र सध्या ही संख्या १० इतकी कमी आहे. एंट्री लेव्हर टेक्निकल स्टाफसाठी सेक्युरिटी असिस्टंट ग्रेड II (टेक) च्या ९९ लोकांना मंजूरी मिळाली आहे, पण ही संख्या ३९ इतकीच आहे.

Parliament Security Breach
Dharavi Redevelopment Project : 'आजच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?' राज ठाकरेंचा मविआ नेत्यांवर घणाघाती आरोप

लोकसभेच्या सेकंड रिंग ऑफ सिक्युरिटी पर्सनल पार्लमेंट हाउस हे गेटवर सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात. यासाठी एकूण ६९ कर्मचाऱ्यांच्या स्टाफला मंजूरी असून सध्या ही संख्या फक्त २४ आहे. तसेच महत्वाची बाबा म्हणजे, यावर्षीच्या शुरूवातीपासूनच ज्वाइंट सेक्रेटरी (सिक्युरिटी) ही पोस्ट देखील रिक्त आहे, ज्याच्या अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभेची सुरक्षेसाठी PSS काम करते.

संसद सुरक्षेत चूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत सर्व राज्यांना या पदांसाठी नॉमिनेशनकरिता पत्र पाठवले आहे. दरम्यान इतकं महत्वाचं पद रिक्त का ठेवण्यात आलं याबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Parliament Security Breach
Parliament Security Breach : संसदेतील घुसखोरीबद्दल PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; तपासाबाबत केलं मोठं विधान

आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

दिल्ली पोलिसांनी संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणात सहा लोकांना अटक केली आङे. यामध्ये सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम देवी, ललित झा आणि महेश कुमावत यांचा समावेश आहे. या आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंट आणि काढून टाकण्यात आलेलं फेसबुक पेज भगत सिंह फॅन क्लब यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी मेटाला पत्र देखील लिहीण्यात आलं आहे. भगत सिंग फॅन क्लबच्या माध्यामातूनच आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले होते. पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सर्व आरोपींच्या बँक खात्यांच्या माहिती देखील मिळवली आहे. जेणेकरून १३ डिसेंबर रोजी झालेल्या घटनेसाठी पैसा कोणी पुरवला याबद्दल माहिती मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.