Parliament Security Breach: संसद सुरक्षेचा भंग करणाऱ्या आरोपींच्या कोठडीत वाढ; नीलमने पॉलीग्राफ चाचणीला दिला नकार

कोर्टाने आदेश दिला आहे की वकिलाच्या उपस्थितीत आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून सर्व चाचण्या केल्या जाव्यात.
Parliament Security Breach
Parliament Security Breach
Updated on

Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज (शुक्रवार) पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) हजर केले. येथे न्यायालयाने सर्व आरोपींच्या कोठडीत पुढील आठ दिवसांची वाढ केली आहे. यासोबतच पाचही आरोपींनी नार्को टेस्टसाठी संमती दिली आहे, तर आरोपी नीलमने पॉलीग्राफ टेस्टसाठी संमती देण्यास नकार दिला आहे.

कोर्टाने आदेश दिला आहे की वकिलाच्या उपस्थितीत आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून सर्व चाचण्या केल्या जाव्यात. आज पटियाला हाऊस कोर्टात (National Human Rights Commission) याबाबत सुनावणी पार पडली. सध्या सर्व आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आज संसद सुरक्षा प्रकरणातील (Parliament Security Breach) आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. जिथे न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ करण्याचा अर्ज मंजूर केला आहे. यासोबतच नार्को टेस्टसाठी अर्जही करण्यात आला होता, ज्यामध्ये आरोपींनीही होकार दिला.

Parliament Security Breach
"गोळ्या घ्यायच्या होत्या अन् नाश्ता...", मारहाण केलीच नसल्याचा आमदार कांबळेंचा दावा, Viral Video नंतर दिलं स्पष्टीकरण

आरोपी ललित झा, महेश कुमावत आणि अमोल यांनी पॉलीग्राफ चाचणीसाठी संमती दिली, तर आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी पॉलीग्राफ, नार्को विश्लेषण आणि ब्रेन मॅपिंगसाठी संमती दिली. तर आरोपी नीलमने पॉलीग्राफ चाचणीसाठी संमती देण्यास नकार दिला.

वकील अमित शुक्ला म्हणाले, विविध कारणांच्या आधारे आरोपींच्या कोठडीत आणखी ८ दिवसांची वाढ करण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. राज्याने नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता, ज्यासाठी पाच आरोपींनी संमती दिली आहे. (Latest Marathi News)

Parliament Security Breach
Sharad Mohol Attacked : कोथरुडमध्ये 'मुळशी पॅटर्न', गुंड शरद मोहोळवर गोळीबार, कोणी केला हल्ला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.