Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी केल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पटियाला हाउस न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली. सागर शर्मा, डी. मनोरंजन, अमोल शिंदे आणि नीलम आझाद अशी चार आरोपींची नावे आहेत. चौघांना पंधरा दिवसांची कोठडी जावी, अशी विनंती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने आरोपींना आठवडाभराची कोठडी सुनावली.
मनोरंजन आणि सागर शर्मा यांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उडी मारत ‘स्मोक कँडल’ द्वारे रंगीत वायू सोडला होता. संसदेबाहेरील परिवहन भवनसमोर नीलम आणि अमोल शिंदे यांनी घोषणाबाजी करत अशाच प्रकारचा वायू सोडला होता.
ललित झा हाच सूत्रधार
संसद भवन परिसरात येण्यापूर्वी हे लोक गुरुग्राममध्ये थांबले होते. या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा नावाचा इसम असून तो अद्याप फरार आहे. संसदेतील घुसखोरीमागे आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे. शिवाय दहशतवादी संघटना यामागे आहेत का? याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोपींना पंधरा दिवसांची कोठडी दिली जावी, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. संसदेत शिरून हल्ला करण्याचा कट नियोजनपूर्वक आखण्यात आला होता.
पंतप्रधान मोदी हेच लक्ष्य
आरोपींकडून जी पत्रके जप्त करण्यात आली आहेत, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्ष्य असल्याचे म्हटले होते, असेही पोलिसांकडून युक्तिवादावेळी सांगण्यात आले. सुनावणीवेळी आरोपींकडून एकही वकील हजर नव्हता. आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे, घुसखोरी, दंगल होईल असे कृत्य करणे, सरकारी सेवेत बाधा आणणे यासह गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) वेगवेगळी कलमे लावण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.