Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करण्याचं कारण आलं समोर?, तरुणांना मदत करणारा पोलिसांच्या ताब्यात

संसदेमध्ये घुसखोरी करणारे चार जण आणि इतर दोन जणांची ओळख पटलेली असून ज्याने इतरांना घुसखोरी करण्यास मदत केली त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Parliament Security Breach
Parliament Security Breachesakal
Updated on

नवी दिल्लीः संसदेमध्ये घुसखोरी करणारे चार जण आणि इतर दोन जणांची ओळख पटलेली असून ज्याने इतरांना घुसखोरी करण्यास मदत केली त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचं म्हणजे या तरुणांनी संसदेमध्ये घुसखोरी का केली? त्याचं कारण स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्या घुसखोरीचं कारण समोर आलेलं आहे. सर्व हल्लेखोर बेरोजगार आहेत आणि नोकरी न मिळाल्याने ते त्रस्त होते, अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. 'लाईव्ह हिंदुस्थान'ने हे वृत्त दिले आहे.

Parliament Security Breach
Pune Loksabha Bypoll Election: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून गोंधळाची स्थिती; राजकीय पक्षांमध्ये धांदल

पोलिसांनी ताब्यात घेतलेले सहाही आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. ते एकमेकांना ओळखत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. बुधवारी त्यांनी संसदेमध्ये जे काही केलं, त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना काहीही माहिती नव्हती. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये नीलम, अमोल, मनोरंजन, विशाल, ललित झा यांचा समावेश आहे.

प्राथमिक चौकशीमध्ये अनमोलने पोलिसांना सांगितलं की, शेतकऱ्यांचे प्रश्न, मणिपूर संकट आणि बेरोजगारीने तरुण त्रस्त आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणी कलम १२० आणि ४५२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

Parliament Security Breach
Old Pension Scheme : आरोग्य यंत्रणा सलाईनवर! राज्यातील परिचारिका संपावर, रुग्णांचे हाल

दरम्यान, या प्रकरणी आज गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निवदेन करणार आहेत. हे चौघे तरुण नेमक्या कोणत्या कारणाने संसदेत घुसले होते, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का? याबाबत सभागृहात खुलासा होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उच्चशिक्षित तरुण थेट संसदेत का घुसले? याचं अधिकृत कारण स्पष्ट झालेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()