Special Session : संसदेत आज CAA संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता; केंद्र सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत?

Amit Shah and Narendra Modi
Amit Shah and Narendra Modiesakal
Updated on

Parliament Special Session 2023 : केंद्र सरकार पुन्हा CAA लागू करण्याच्या तयारी असल्याचं दिसून येत आहे. हा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासंदर्भात आज (बुधवारी) संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

२०१९-२०२०मध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात देशभरामध्ये रान उठलं होतं. दिल्लीसह अनेक मठ्या शहरांमध्ये आंदोलनं झाली. एनआरसीसंदर्भात तेव्हा कुठलीच कार्यवाही केंद्र सरकारने केलेली नव्हती. मात्र सीएएसंदर्भात बोलणी सुरु झालेली होती. आज बुधवारी त्याचं नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे.

Amit Shah and Narendra Modi
संतापजनक! पोलिसानं स्वतःच्या चार महिन्याच्या बाळाला रस्त्यावर आपटलं; क्षणात चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी अंत, असं काय घडलं?

मंगळवारी लोकसभेमध्ये महिला आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आलेलं आहे. त्यावर आज चर्चा होणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल. सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येतंय की, बुधवारी सीएएसंदर्भात नोटिफिकेशन निघाल्यानंतर लगेचच जनगणनेच्या कामाला सुरुवात होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाणार असून ही समिती महिला आरक्षणासंदर्भातील तांत्रिक बाजूंचा अभ्यास करेल. या समितीचा अहवाल आल्यानंतर देशात महिला आरक्षण कायदा लागू होईल.

Amit Shah and Narendra Modi
Women Reservation Bill : महिलांना विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा कायदा झाला तर... ; राज्याला मिळेल महिला मुख्यमंत्री? जाणून घ्या

महत्त्वाचं म्हणजे सीएए संदर्भात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. हा कायदा नागरिकत्व घेणारा नसून देणारा असल्याचं भाजपने पूर्वी म्हटलं होतं. परंतु त्यासाठी सर्वांना जुने पुरावे सादर करावे लागतील का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.