Special Session : महिला आरक्षण विधेयकासाठी आज महत्त्वाचा दिवस; सोनिया गांधी असणार लीड स्पीकर

Special Session : महिला आरक्षण विधेयकासाठी आज महत्त्वाचा दिवस; सोनिया गांधी असणार लीड स्पीकर
Sakal
Updated on

नवी दिल्लीः महिलांना ३३ टक्के आरक्षणाचं विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. आज त्यावर प्रदीर्घ चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या विधेयकावर आपली भूमिका मांडतील. त्या लीड स्पीकर असणार आहेत.

महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणलं आहे. मागील कित्येक वर्षांपासून या बिलासंदर्भात चर्चा होत होती. अखेर सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत हे विधेयक मंजूर झालं.

Special Session : महिला आरक्षण विधेयकासाठी आज महत्त्वाचा दिवस; सोनिया गांधी असणार लीड स्पीकर
Weather Update: पुण्यासह राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता; आज 'या' जिल्ह्यांना इशारा

त्यानंतर मंगळवारी लोकसभेत कायदामंत्र्यांनी हे बिल मांडलं. आज त्यावर पक्षाच्या मुख्य वक्त्या म्हणून सोनिया गांधी बोलणार आहेत. लोकसभेमध्ये विधेयकावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चर्चा होईल. भाजप, काँग्रेस आणि इतरही पक्ष या चर्चेत सहभागी होतील.

२०१० मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये राज्यसभेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकामागे सोनिया गांधी यांचा पुढाकार होता. परंतु तेव्हा हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर होऊ शकले नव्हते.

Special Session : महिला आरक्षण विधेयकासाठी आज महत्त्वाचा दिवस; सोनिया गांधी असणार लीड स्पीकर
Sakal Podcast : भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर आणि पडळकरांना फडणवीसांचा घरचा आहेर

स्मृती इराणी, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक महिला नेत्या विधेयकावरील चर्चेत सहभागी होणार असून नारी शक्ती वंदन विधेयकासाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. आरक्षणाची मर्यादा, ओबीसी प्रवर्गाच्या संधी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.