नव्या असंसदीय शब्दांची यादी पाहून विरोधकांची टीका , "पुढे काय विश्वगुरु?"

Narendra Modi
Narendra Modi Narendra Modi on Nepal tour
Updated on

नवी दिल्ली - आता संसदेच्या कामकाजादरम्यान जर एखाद्या खासदाराने सरकार 'हुकूमशहा' झाले किंवा विरोधक 'हुकूमशाही' करत आहेत अशा शब्दांचा उल्लेख केल्यास हे शब्द संसदेच्या नवीन नियमांनुसार असंसदीय मानले जाईल. तसेच ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जाईल. एवढेच नाही तर आता संसदेत जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी, जुमलाजीवी या शब्दाचा उच्चार देखील असंसदीय मानला जाणार आहे. (unparliamentary words news in Marathi)

Narendra Modi
आदित्य ठाकरेंना शह; 'राज पुत्र' अमित यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान?

लोकसभा आणि राज्यसभेच्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा नियम लागू केला जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेत म्हटले की, 'जुमलाजीवी', 'चाइल्ड विजडम', 'कोविड स्प्रेडर' आणि 'स्नूपगेट' असे शब्द लोकसभेत आणि राज्यसभेत असंसदीय मानले जातील. लोकसभा सचिवालयाने ज्या शब्दांचे वर्णन असंसदीय म्हणून केले त्यापैकी काही अतिशय सामान्य शब्द आहेत ते बोली भाषेत सहज वापरले जातात. यामध्ये 'शरमदार', 'अब्यूज्ड, 'बेट्रेड', 'भ्रष्ट', 'नाटक', 'ढोंगी' आणि 'अकार्यक्षम' या इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा समावेश आहे. म्हणजेच संसदेच्या कामकाजादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत हे शब्द वापरता येत नाहीत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून शब्दांची यादी आली आहे. या यादीत शकुनी, हुकूमशहा, हुकूमशाही, जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी, Anarchist आणि dictatorial खून से खेती, अराजकतावादी आणि हुकूमशाही असे अनेक इंग्रजी-हिंदी शब्द आहेत. याचा अर्थ संसदेत चर्चेवेळी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी हे शब्द वापरले गेले तर ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील.

Narendra Modi
‘शॉर्टकट’च्या राजकारणातून विकास होत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा सचिवालयाने आपल्या यादीत आणखी अनेक शब्द समाविष्ट केले आहेत. जे शब्द संसदेत सरकारवर टीका करण्यासाठी वापरले जातात. दुटप्पी, निरुपयोगी, नौटंकी, ढोल बडवणारे, बहिरे सरकार, असे शब्दही असंसदीय शब्दांच्या यादीत टाकण्यात आले आहेत. हिंदीतील गद्दार, गिरगिट, घड़ियाली आंसू, अपमान, असत्य, अहंकार, करप्ट, काला दिन, काला बाजारी आणि खरीद फरोख्त शब्द देखील असंसदीय मानले जाणार आहे.

दरम्यान विरोधकांनी टीका यावर केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश म्हणाले की, मोदी सरकारच्या “वास्तविकतेचे वर्णन करण्यासाठी” वापरले जाणारे सर्व शब्द आता ‘असंसदीय’ ठरवण्यात येणार आहे. "या पुढे काय विश्वगुरु? अस म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.