Parliament New Uniform
Parliament New Uniform esakal

Parliament New Uniform : कमळवाला शर्ट अन् मणिपूरी टोपी, नव्या संसद भवनात युनिफॉर्मसुद्धा नवा..जाणून घ्या नवे बदल

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या संसदेतील विशेष अधिवेशनात कर्मचारी नवीन युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत.
Published on

Parliament Uniform New Changes : केंद्र सरकार 18 ते 22 सप्टेंबर असे 05 दिवस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. मात्र, या अधिवेशनाचा अजेंडा काय असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नुकतीच केंद्र सरकारकडून वन नेशन वन इलेक्शनसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्यानंतर सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात 'वन नेशन-वन इलेक्शन' विधेयक मांडणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या संसदेतील विशेष अधिवेशनात कर्मचारी नवीन युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत.

नवीन संसद भवनात असा असणार प्रवेश

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून जुन्या संसद भवनातून सुरू होणार असून, त्यात जुन्या संसद भवनाच्या बांधकामापासून आतापर्यंतच्या संसद भवनातील विशेष आठवणींवर चर्चा केली जाणार आहे. यानंतर 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजेनंतर नवीन संसद भवनात प्रवेश केला जाईल आणि दोन्हींची संयुक्त बैठकही होऊ शकते.

नव्या संसद भवनात कर्मचारी दिसणार नव्या युनिफॉर्ममध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या संसद भवनात कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्मसुद्धा बदलणार आहे. येथील कर्मचाऱ्यांनी नवीन पोषाख देण्यात येईल, ज्यावर भारतीयत्वाचं प्रतिक असेल. नवे युनिफॉर्म National Institute Of Fashion Technology (NIFT) ने डिझाइन केलेले आहे.

याअंतर्गत सचिवालयातील कर्मचाऱ्यांचा बंद गळ्याचा युनिफॉर्म बदलून मॅजेंटा किंवा गडद गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट असेल. ज्यावर कमळाच्या फूलाचे चिन्ह असेल आणि खाकी रंगाचा पँट असेल.

Parliament New Uniform
Parliament Special Session: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार OBCबाबत काही मोठा निर्णय घेणार?

दोन्ही संसद भवनात मार्शलचा युनिफॉर्म बदलला जात असून आता ते मणिपुरी पगडी घालणार आहेत. संसद भवनातील सुरक्षा कर्मचार्‍यांच्या युनिफॉर्ममध्येही बदल केला जाईल, आतापर्यंत ते सफारी सूट परिधान करत होते, त्याऐवजी त्यांना सैनिकांप्रमाणे कॅमोफ्लेज युनिफॉर्म दिला जाईल. (Trends)

Parliament New Uniform
Uniform Civil Code : तेढ निर्माण करण्यासाठी समान नागरी कायद्याविषयी अफवा : रमेश पतंगे

संसद भवनातील या कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्ये होणार बदल

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवनातील पाच प्रमुख शाखांचे म्हणजेच रिपोर्टिंग, टेबल ऑफिस, नोटीस ऑफिस, विधिमंडळ शाखा आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी नवीन युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.