नवी दिल्ली - वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या छाननीसाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) कार्यकाळ २९ नोव्हेंबरपर्यंत असून समितीच्या मसुदा अहवालाच्या अध्ययनासाठी लागणारा वेळ पाहता ‘जेपीसी’ला मुदतवाढ द्यावी, असा आग्रह विरोधी पक्षाच्या खासदारांनी धरला.