विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार - PM मोदी

Parliament Winter Session: पंतप्रधान मोदींनी ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमिवर सतर्कतेचा इशारा दिला आहे.
narendra modi.
narendra modi.sakal
Updated on

दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेच्या परिसरात पोहोचले असून, त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. अधिवेशनादरम्यान सर्व खासदारांना गदारोळ न करण्याचं आवाहन केलं आहे. संसदेच्या या अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. जगभारत सध्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे भीती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदींनी देखील सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

narendra modi.
Omicron किती धोकादायक? पहिल्यांदा डिटेक्ट करणारे डॉक्टर म्हणतात..

संसदेचं हे सत्र महत्वपुर्ण असून, या सत्रामध्ये सर्व खासदारांनी चांगले मुद्दे उपस्थित करत, त्या मुद्दांवर चर्चा करावी. संसदेत होणाऱ्या गोंधळावरून नाही तर संसदेत उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्दयावरून गुणवत्ता ठरवली जावी असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं. या अधिवेशनात विरोधकांनी चांगले प्रश्न उपस्थित करावेत, आम्ही त्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आणि सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

narendra modi.
संसदेत हिवाळी अधिवेशनाला सुरूवात; सर्व खासदारांना व्हिप

देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत मोहोत्सवात स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी सामान्य नागरिक सुद्धा प्रयत्न करत आहेत, हे भारतासाठी शुभसंकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()