Air India च्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
मुंबई : Air India च्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडलीये. ही घटना गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरची आहे.
या घटनेवर विमान कंपनीनं कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर वृद्ध महिलेनं टाटा समूहाच्या अध्यक्षांकडं तक्रार केली, त्यानंतर विमान कंपनीचे अधिकारी सक्रिय झाले आणि त्यांनी दिल्ली पोलिसांकडं FIR दाखल केला आणि तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीला विमान प्रवास करण्यास बंदी घातली.
महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्या आरोपीचं नाव शेखर मिश्रा (Shekhar Mishra) असून तो मुंबईतील रहिवासी आहे. त्याचं वय 45 ते 50 दरम्यान आहे. शेखर मिश्रावर 26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा आरोप आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांना 28 डिसेंबर रोजी विमान कंपनीकडून घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील अधिक तपशील मिळविण्यासाठी पीडितेशी संपर्क साधला. आरोपीविरुद्ध 4 जानेवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेनं 27 नोव्हेंबर 2022 रोजीच तिची लेखी तक्रार एअरलाइन्सकडं केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस (Delhi Police) आरोपीला अटक करण्यासाठी मुंबईला जाऊ शकतात, असं कळतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.