PUBG : वडिलांनी पब्जी खेळण्यास नकार दिल्यानं मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Mobile Game Pubg
Mobile Game Pubgesakal
Updated on
Summary

यापूर्वी PUBG खेळण्यास नकार दिल्यानं 16 वर्षांच्या मुलानं आईची गोळ्या घालून हत्या केली होती.

मोबाईल गेम PUBG चं व्यसन किती वाईट आहे, हे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनौमध्ये पाहायला मिळालं. इथं PUBG खेळण्यास नकार दिल्यानं 16 वर्षांच्या मुलानं आईची गोळ्या घालून हत्या केली. आता बिहारमधील पाटणामध्ये वडिलांनी PUBG खेळण्यास नकार दिल्यानं एका तरुणानं गळफास लावून आत्महत्या केलीय.

ही घटना पाटणा जिल्ह्यातील अथमलगोला पोलीस स्टेशन हद्दीमधील बहादूरपूर गावातील आहे. राजा कुमार नावाच्या तरुणाला त्याचे वडील रमाकांत यांनी PUBG खेळण्यास मनाई केली, तेव्हा राजाला त्याचा खूप राग आला. यानंतर त्यानं रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवलाय. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचीही नोंद करण्यात आलीय.

Mobile Game Pubg
अमेरिका पुन्हा हादरलं; नाईट क्लबमध्ये गोळीबार, 2 ठार तर 4 जण गंभीर जखमी

यापूर्वी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. इथं एका अल्पवयीन मुलानं आपल्या आईचा PUBG गेम खेळण्यास नकार दिल्यानं त्यानं आईची गोळ्या झाडून हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर, अल्पवयीन मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहासह घरात कोंडून राहिला होता. मंगळवारी यमुनापूरम कॉलनीतून पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता, शेजारच्या घरातून उग्र वास येत असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यांना घरात कोणीचा तरी खून झाल्याचा संशय आला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिथं महिलेचा मृतदेह आढळून आला.

Mobile Game Pubg
नेपाळ सीमेवरून चिनी नागरिकांची थेट भारतात घुसखोरी; नोएडात दोघांना अटक

आईला का आणि कधी मारलं?

आरोपी मुलानं पोलिसांना सांगितलं की, शनिवारी (4 जून 2022) रात्री तीन वाजता त्यानं आईची हत्या केली. आईनं शनिवारी रात्री आठ वाजता त्याच्यावर 10 हजार रुपये चोरी करण्याचा आरोप केला होता. काही वेळानंतर पैसे सापडले होते. मात्र, आई त्यालाच चोर समजत होती. यानंतर कपाटातून त्यानं पिस्तूल काढली. त्यात नेहमी एक गोळी लोड केलेली असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.