'4 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला, तर नितीश कुमारांचं सरकार कोसळणार'

Jitan Ram Manjhi Nitish Kumar
Jitan Ram Manjhi Nitish Kumaresakal
Updated on
Summary

'बिहारमध्ये 4 आमदार हटवताच एनडीए राम-राम म्हणायला सुरुवात करेल.'

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi) सतत चर्चेत असतात. ब्राह्मण जातीविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षानं आता नितीश कुमार (Nitish Kumar) यांचं सरकार पाडण्याची धमकी दिलीय. माजी मुख्यमंत्री मांझी यांच्या पक्षातील एका बड्या नेत्यानं सांगितलं, की बिहारमध्ये 4 आमदार हटवताच एनडीए राम-राम म्हणायला सुरुवात करेल, असा दावा केलाय. हिंदुस्थानी आवाम मोर्चाच्या (Hindustani Awam Morcha) नेत्याच्या वक्तव्यामुळं बिहारचं (Bihar) राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालीय.

माजी मुख्यमंत्री मांझींच्या ब्राह्मण जातीबाबतच्या वक्तव्यानंतर, मंत्री नीरजकुमार बबलू (Neeraj Kumar Bablu) यांनी मांझींवर जोरदार टीका केलीय. त्यांनी मांझींना राजकारणातून निवृत्ती घेऊन राम-राम असा जप करावा, असा सल्ला दिलाय. नीरजकुमारांच्या वक्तव्यानंतर हिंदुस्थानी पक्षाच्या नेत्यानं पलटवार केलाय. हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान (Danish Rizwan) यांनी, जीतनराम मांझी यांना सल्ला देणारा नीरज सिंह बबलू कोण आहे? असा सवाल उपस्थित करत रिझवान यांनी भाजप नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांच्यावरही निशाणा साधलाय. जर आम्ही आमचे 4 आमदार काढून घेतले, तर एनडीएचे नेते रस्त्यावर येतील, असा त्यांनी इशारा दिलाय.

Jitan Ram Manjhi Nitish Kumar
भाजपला धक्का! 5 आमदारांनी सोडला पक्षाचा WhatsApp Group

दानिश रिझवान यांनी, नीरज बबलूला काहीही बोलण्यापूर्वी वयाची काळजी घेण्याचाही सल्ला दिलाय. ते म्हणाले, नीरज कोणाबद्दल आणि काय बोलत आहे, याचा विचार करायला हवा. हिंमत असेल तर त्यांनी भाजप नेत्यांवरही बोलावं. धर्मनिरपेक्षांना प्राण्यांपेक्षाही वाईट म्हणणाऱ्या कैलाश विजयवर्गीय यांनाही त्यांनी इशारा दिलाय. जर आमच्या पक्षाचे 4 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला, तर एनडीएचे नेते कुठे जातील, याचा पत्ताही लागणार नाही, असंही त्यांनी म्हंटलंय.

Jitan Ram Manjhi Nitish Kumar
'शरद पवारांचा तो शब्द अन् अवघ्या 1 मतानं वाजपेयी सरकार कोसळलं'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.