Patna Meeting: विरोधकांची बैठक संपली; नितीश कुमारांनी सांगितली पुढची रणनीती

पाटणा इथं देशातील प्रमुख विरोधीपक्षांची महत्वाची बैठक पार पडली. भाजपला आव्हान देण्यासाठी ही बैठक होती.
Patna Meeting: विरोधकांची बैठक संपली; नितीश कुमारांनी सांगितली पुढची रणनीती
Updated on

पाटणा : देशातील प्रमुख विरोधीपक्षांची महत्वाची बैठक पाटणा इथं पार पडली. भाजपला आव्हान देण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. पण यानंतर आणखी एक बैठक होईल, त्यामध्ये विरोधकांच्या चर्चेला अंतिम स्वरुप येईल, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. (Patna meeting nitish kumar adressed at press conference from opposition parties)

नितीश कुमार म्हणाले, "आजची विरोधकांची बैठक चांगली झाली. या बैठकीत सर्वांनी एकत्र चालायचं असं ठरलं आहे. त्याचप्रमाणं सर्वांनी एकत्र निवडणूक लढवायची असंही यामध्ये निश्चित झालं असून यापुढे आणखी एक बैठक होईल. या बैठकीच आयोजन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करतील. या बैठकीत विरोधकांच्या अजेंड्याला अंतिम स्वरुप येईल, सध्या देशात जे सत्ताधारी आहेत ते देशाच्या हिताचं काम करत नाहीएत" (Latest Marathi News)

Patna Meeting: विरोधकांची बैठक संपली; नितीश कुमारांनी सांगितली पुढची रणनीती
Rahul Gandhi: भाजप आणि संघाकडून भारतात आक्रमण, विरोधकांच्या बैठकीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

कोण कुठे लढेल, कसं लढेल याबाबत क्लिअर होईल. त्यामुळं आजतर सहमती झाली आहे. सर्वांनी मानलं आहे की सर्वजण मिळू चालतील. हे देशाच्या हिताचं आहे. सध्या जे सत्तेत आहेत ते देशाच्या हिताचं काम करत नाहीत. सर्व इतिहास बदलू पाहत आहेत. ते स्वातंत्र्याचा इतिहासही बदलून टाकतील, त्यामुळं त्यांना रोखणं गरजेचं आहे, असंही यावेळी नितीशकुमार म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

Patna Meeting: विरोधकांची बैठक संपली; नितीश कुमारांनी सांगितली पुढची रणनीती
Patna Meeting: विरोधकांच्या बैठकीत ठरला कार्यक्रम; 'असा' असणार किमान समान कार्यक्रम!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "सर्व नेते एकत्र येऊन पुढे निवडणूक लढवण्यासाठी कॉमन अजेंडा तयार करत आहोत. यासाठी पुढची बैठक १२ जुलै रोजी शिमल्यात होईल. सर्व नेत्यांचं मत घेऊन मग तारीख निश्चित होईल.

पुढच्या बैठकीत आम्ही एकत्र बसून एक अजेंडा तयार करु. तसेच कोणकोणत्या विषयांवर आम्ही निर्णय घेऊ शकतो तसेच पुढे कशाप्रकारे लढायला हवं. तसेच प्रत्येक राज्यात आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे लढावं लागेल. सर्व राज्यांनासाठी एकसारखीच स्थिती असू शकत नाही. त्यामुळं याबाबत सर्वतोपरी विचार करुन रणनीती बनवण्यावर आम्ही चर्चा करु"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.