पाटणा : भाजपविरोधात रणनीती तयार करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधीपक्षांची पहिली बैठक शुक्रवारी पाटण्यात पार पडली. या बैठकीनंतर सर्वपक्षीय नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करता करता मध्येच राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय काढला. यामुळं राजकीय चर्चांचं वातावरण काहीसं हास्यात परावर्तीत झालं. (Patna Meeting press conference subject of Rahul Gandhi marriage raised by Lalu Prasad Yadav)
लालू प्रसाद म्हणाले, "आम्ही सर्वजण संपूर्ण मजबुतीनं एकत्र आहोत. या ठिकाणी राहुल गांधी देखील आले आहेत, त्यांनी गेल्या काही दिवसांत 'भारत जोडो' यात्रेद्वारे चांगलं काम केलं आहे. त्यांचं भारतभर पायी चालणं लोकांना आवडलं. लोकसभेतही अदानी प्रकरणावर त्यांनी चांगलं काम केलं. भारतभर फिरत असताना त्यांनी दाढी वाढवली. (Latest Marathi News)
पण राहुल गांधींनी माझा सल्ला ऐकला नाही त्यांनी लग्न करायला हवं होतं, अजूनही वेळ गेलेली नाही. लग्न करा आम्ही वऱ्हाडी म्हणून येऊ. लग्न करा, आमचं ऐका! तुमची मम्मी आम्हाला सांगायच्या की राहुल आमचं आमचं ऐकत नाहीत, तुम्ही त्यांना समजावून सांगा" लालूंच्या या सल्ल्यावर राहुल गांधी यांनी मान डोलावत त्यांना सकारात्मक प्रतिसादही दिला. यावेळी पत्रकार परिषदेतील तणावाच्या वातावरणात काहीसे हास्याचे तरंग उमटले. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, लालू प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरुन टीका केली. म्हणाले, "विरोधीपक्ष विखुरलेला असतो त्यामुळं भाजप, आरएसएस निवडणुका जिंकतात. मोदी अमेरिकेत जाऊन भाषणं ठोकत आहेत, ज्या अमेरिकेनं नरेंद्र मोदी, अमित शहा यांना गुजरात दंगलीनंतर आपल्या देशात यायला बंदी घातली होती.
पण आता काय झालंय माहिती नाही की ते विसरलेत अमेरिकेनं त्यांना काय म्हटलं होतं आणि ते परत अमेरिकेत जायला लागले आहेत. पण आता देश तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. देशात महागाई वाढली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपवाल्यांनी हनुमानाचं नाव घेऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण असं असलं तरी लोकांनी त्यांना नाकारलं आणि राहुल गांधींचा पक्ष जिंकला"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.