NEET Paper Leak: पाटण्यातल्या ज्या शाळेत 'नीट' परीक्षेचे प्रश्नोत्तरं पाठ करुन घेतले, त्या घरमालकाची मुलगीसुद्धा MBBS

NEET Paper Leak: पाटण्यातल्या ज्या शाळेत 'नीट' परीक्षेचे प्रश्नोत्तरं पाठ करुन घेतले, त्या घरमालकाची मुलगीसुद्धा MBBS
Updated on

NEET Exam : नीट पेपर लीक प्रकरणाध्ये रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. यातच पाटण्यामध्ये एक विचित्र प्रकार पुढे आला आहे. शहरातल्या खेमनीचक भागात ज्या लर्न अँड प्ले शाळेत परीक्षार्थ्यांकडून नीटची प्रश्नपत्रिका पाठ करुन घेतली होती, त्या घरमालाबद्दल एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार घर मालकाची मुलगी प्रभात रंजनची मुलगी एमबीबीएस पास आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, हा केवळ योगायोग आहे की नीट पेपर लीक प्रकरणाचं तिच्याशी कनेक्शन आहे?

NEET Paper Leak: पाटण्यातल्या ज्या शाळेत 'नीट' परीक्षेचे प्रश्नोत्तरं पाठ करुन घेतले, त्या घरमालकाची मुलगीसुद्धा MBBS
Manoj Jarange : इकडे आड-तिकडे विहीर! 'सगेसोयरे'च्या निर्णयाअगोदर सर्वपक्षीय बैठक; काय आहे सरकारच्या मनात? जरांगे म्हणतात...

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातला माफिया संजीव मुखियाचा मुलगा डॉक्टर शिव हासुद्धा एमबीबीएस पास आहे. तर नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी सिकंदरची मुलगीसुद्धा एमबीबीएस पासआऊट आहे.

सिकंदर हा बिहार सरकारमधील ज्युनियर इंजिनिअर आहे. यासह प्रभात रंजनच्या मुलीनेही एमबीबीएस केलेलं आहे. प्रभार रंजनच्या खेमनी येथील घरात २० ते २५ विद्यार्थ्यांना ४ मेच्या रात्री युजी प्रश्न आणि त्याचे उत्तर पाठ करुन घेतले होते.

NEET Paper Leak: पाटण्यातल्या ज्या शाळेत 'नीट' परीक्षेचे प्रश्नोत्तरं पाठ करुन घेतले, त्या घरमालकाची मुलगीसुद्धा MBBS
Manoj Jarange Health Update : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली! पुन्हा लावलं सलाईन

सूत्रांच्या माहितीनुसार, नालंदा येथील संजीव मुखियाचे प्रभात रंजनसोबत जवळचे संबंध आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संजीव रंजन मुखियाच्या सांगण्यावरुनच प्रभात रंजन याने आशुतोषला भाड्याने घर दिलं होतं. पोलिसांच्या सांगण्यानुसार प्रभात रंजनची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.