Naveen Patnaik : पटनाईक यांनी बनविले ‘शॅडो कॅबिनेट’;ओडिशातील भाजप सरकारवर लक्ष ठेवण्याचे आमदारांना निर्देश

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते नवीन पटनाईक यांनी बिजू जनता दलाच्या (बीजेडी) ५० आमदारांवर विविध सरकारी विभागांची जबाबदारी सोपविली असून भाजप सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे.
Naveen Patnaik
Naveen Patnaiksakal
Updated on

भुवनेश्‍वर : ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते नवीन पटनाईक यांनी बिजू जनता दलाच्या (बीजेडी) ५० आमदारांवर विविध सरकारी विभागांची जबाबदारी सोपविली असून भाजप सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे.

राज्याचा अर्थसंकल्पी अधिवेशन सोमवारी (ता.२२) सुरू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पटनाईक यांनी हा अनोखा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षाने त्यांच्या आमदारांवर विभागनिहाय जबाबदारी सोपविण्याची ही देशात पहिलीच घटना आहे. विधानसभेत भाजप सरकारला तोडीस तोड उत्तर देणे हा यामागील उद्देश आहे, असे ‘बीजेडी’चे म्हणणे आहे. आमदारांनी त्यांच्याकडे सोपविलेल्या विभागांशी संबंधित मुद्दे विधानसभेत मांडण्याची सूचनाही करण्यात आली आहे. विधानसभेत येत्या २५ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

‘बीजेडी’च्या अध्यक्षांच्या आदेशात म्हटले आहे की, आमदारांनी त्यांच्याकडील विभागांवर बारकाईने लक्ष ठेवावे, त्यासंबंधीच्या मुद्द्यांवर विधानसभेत हस्तक्षेप करावाआणि प्रश्‍न मांडावेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पटनाईक यांनी शनिवारी (ता.२०) ‘बीजेडी’ची बैठकही बोलावली आहे.

निवडक विभागांची जबाबदारी

  • विरोधी पक्षाचे उपनेते प्रसन्ना आचार्य : अर्थ, सार्वजनिक उपक्रम विभाग

  • विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद : पंचायतराज आणि पेयजल आणि संसदीय कामकाज विभाग

  • उपमुख्य प्रतोद प्रताप देव : सामान्य प्रशासन, सार्वजनिक तक्रार विभाग

  • निरंजन पुजारी : गृह, अन्न आणि ग्राहक कल्याण

  • अरूण साहू : जलस्रोत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.