Patrakar Din : भुकेलं गिधाड आणि ती मुलगी; पत्रकाराच्या मृत्यूला जबाबदार ठरलेला तो फोटो!

फोटो प्रकाशित झाल्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते
Patrakar Din
Patrakar Din Esakal
Updated on

तूमच्या आय़ुष्यात एखादी छोटी घटनाही तूम्हाला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. यशाचा आनंद लुटत असताना तूम्हाला एखादी शुल्लक गोष्टही जीवन संपवण्यास भाग पाडू शकते. अनेक मोठे उद्योगपती, अभिनेते, चित्रकार यांनाही काही काळानंतर जीवन संपवण्याचे विचार येऊ शकतात.

असाच एक पत्रकार होऊन गेला. ज्याला त्याच्या कामाने नाव तर मिळवून दिले. पण, त्याच कामाने जीवन संपवण्यास मजबूरही केले. आज पत्रकार दिन आहे. यानिमित्तानेच त्या एका पत्रकाराची गोष्ट जाणून घेऊयात.

Patrakar Din
HIV Vaccine : अभिमानास्पद! नागपूरकरांनी शोधली एड्सची लस, उंदरावर प्रयोग यशस्वी

एक अगदी मरायला टेकलेली मुलगी आणि तिच्या बाजूला उभे असलेले गिधाड यांचा हा फोटो तूम्ही सोशल मिडीयावर अनेकवेळा पाहिला असेल. तो फोटो प्रसिद्ध छायाचित्रकार केविन कार्टर यांनी काढला आहे. याच फोटोमूळे कार्टर यांनी आत्महत्याही केली आहे.

मार्च 1993  मध्ये जर्नलिस्ट केविन कार्टर दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण सुदानला फोटोशूट करण्यासाठी गेले होते. या फोटोत दिसणारी लहान मुलगी भुकेने व्याकूळ झाली आहे. तिला खाण्यासाठी अनेक दिवसात काहीच मिळालेले नाही. त्यामूळे तिच्या हाडांचा सापळा झाला आहे. या मुलीच्या बाजूलाच एक गिधाड उभे आहे.

Patrakar Din
Covid Symptoms : कोरोनाची नवी लक्षणं कोणती?; या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका!

ती मुलगी उठेल आणि त्याला काहीतरी खायला देईल,यासाठी ते तिथे उभे नाही. तर, ते त्या मुलीच्या मरणाची वाट पाहत उभे आहे. कि कधी ती मुलगी जीव सोडते आणि त्याच्या पोटात ती जाते.

या फोटो बद्दल केविनने सांगितले होते की, त्या मुलीच्या अंगात जीव नसल्याने ती रांगतच घराकडे जात होती. तिचे आई-वडील अन्न शोधण्यासाठी जंगलात गेले होते. तिथेच एक एक गिधाड उभे होते. 20 मिनिटे ते गिधाड हलले नाही. भक्षावर लक्ष केंद्रीत करून ते एका जागीच थांबले होते. मी गिधाड तिथून जाण्याची वाट पाहत राहिलो. पण, ते जागचे हालले नाही. मी तेव्हा तो फोटो काढला.

Patrakar Din
Physical Relation: शारीरिक संबंधांनंतर पुरूष काय विचार करतात माहितीये का ?

केविनच्या या फोटोला पुलित्झर पुरस्कार मिळाला. हे पारितोषिक जिंकल्यानंतर तीन महिन्यांनी त्याने आत्महत्या केली. पण, केविनची खरी गोष्ट तर इथे आहे. केविनने हा फोटो न्यूयॉर्क टाइम्सला विकला होतो. हा फोटो पहिल्यांदा 26 मार्च 1993 रोजी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झाला. फोटो प्रकाशित झाल्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

फोटोचे कॅप्शन "आफ्रिकेतीन निराशेचे रूपक" असे होते. फोटो प्रकाशित होताच लाखो लोकांनी केविन कार्टरला या इथिओपियन मुलीबद्दल हजारो प्रश्न विचारले. त्या रांगणाऱ्या मुलीला वाचवता आले असते. पण, त्याऐवजी त्याला फोटो काढणे त्याला योग्य वाटले, असा आरोपही अनेकांनी त्याच्यावर केला.

Patrakar Din
Pune Mhada: म्हाडाकडून पुण्यात 5,990 फ्लॅट्ससाठी सोडत जाहीर; जाणून घ्या कसा कराल अर्ज

एका पत्रकारपरिषदेत त्याला एका व्यक्तीने विचारले की, तूम्ही हा फोटो काढला तेव्हा तिथे किती गिधाड होते. केविन म्हणाला एकच. त्यावर हे चुकीचे आहे. तिथे दोन गिधाडे होती. एक ते जे त्या मुलीच्या मरणाची वाट पाहत होते. तर, दुसरे म्हणजे, जे फोटो काढत होते. ते ऐकून केविन अवाक झाला आणि त्याच्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले.

फोटो काढल्यानंतर तीन महिन्यात केविनला ती इथिओपियन मुलगी नेहमी आठवायची. लोकांचे प्रश्न, तक्रारी त्यांना सतावत होत्या. आपण मुलीला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला नाही. आणि ती मुलगी जगली की मेली हेही पाहिले नाही. याचा त्याला पश्चाताप झाला. अपराधीपणाच्या भावनेने तो पछाडलेला होता. याच निराशेत जाऊन त्याने आपले जीवन संपवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.