Tomato Prices in India : Paytm वर अर्ध्या किमतीत मिळतायत टोमॅटो; घरबसल्या करता येईल ऑर्डर...

कसं...खालील लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या...
tomato
tomato esakal
Updated on

पेटीएमने स्वस्त दरात टोमॅटो विकण्याची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामुळे आता अर्ध्या किंमतीत म्हणजे प्रति किलो ७० रुपयांत टोमॅटो खरेदी करता येणार आहेत. ही सुविधा दिल्ली एनसीआर भागात उपलब्ध आहे.

भारतात अचानक टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे लोकांना १५० ते २०० रुपये प्रतिकिलो इतक्या भावाने टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. स्वस्त दरात टोमॅटो विकण्यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) आणि NCCF यांनी भागिदारी केली आहे. पेटीएम ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडने सांगितलं की त्यांनी दिल्ली एनसीआर भागामध्ये ७० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकण्यासाठी ही भागिदारी केली आहे.

tomato
Tomato Side Effect : टोमॅटोचे अतिसेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

या अंतर्गत युजर्सना एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त दोन किलो टोमॅटो म्हणजे १४० रुपयांचे टोमॅटो खरेदी करता येतील. यासोबतच त्यांना मोफत डिलिव्हरी मिळेल. पेटीएमच्या या उपक्रमाचा फायदा अनेकांना होणार आहे. विशेष म्हणजे त्यांना जे २०० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो खरेदी करत आहेत.

ऑर्डर कशी कराल?

पेटीएमवरुन स्वस्त दरात टोमॅटो मागवण्यासाठी युजर्सना सर्वात आधी पेटीएमचं अॅप घ्यावं लागेल. हे अॅप घेतल्यावर त्यातलं ONDC Food हे पेज सुरू करायचं. तिथे गेल्यावर Tomatoes for NCCF हा पर्याय निवडायचा. त्यानंतर आपल्याला किती टोमॅटो हवेत, हे प्रमाण द्यायचं. त्यानंतर आपला पत्ता टाकायचा. पुढे पेमेंटचा पर्याय निवडायचा. पेमेंट झाल्यावर ऑर्डर कन्फर्म होईल.

ऑर्डर करण्याआधी हे लक्षात असूद्या की एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त १४० रुपयांच्या टोमॅटोच्या खरेदीवरच फ्री डिलिव्हरी दिली जाईल. कंपनीने असंही सांगितलं की, टोमॅटोच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. टोमॅटो स्वस्त किमतीत विकण्यासाठी सरकारनेही पुढाकार घेतला आहे. सरकारच्या योजनेनुसार दिल्ली एनसीआर भागामध्ये टोमॅटो ९० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.