Mehbooba Mufti: मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात; दुर्घटनेवेळी गाडीमध्येच होत्या

PDP chief Mehbooba Mufti car met with an accident पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्या गाडीमध्येच होत्या. सुदैवाने त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही.
 Mehbooba Mufti car met with an accident
Mehbooba Mufti car met with an accident
Updated on

श्रीनगर- पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे दुर्घटनेवेळी त्या गाडीमध्येच होत्या. सुदैवाने त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (PDP chief Mehbooba Mufti car met with an accident while travelling to Jammu and Kashmir Anantnag)

मेहबुबा मुफ्ती या जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्याकडे जात होत्या. यावेळी एका नागरिकाच्या गाडीशी त्यांची कार धडकली. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांना अपघातात कसलीही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मुफ्ती यांचा सुरक्षारक्षक कारमध्येच होता. त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरमधून अनंतनाग येथे आग दुर्घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी अनंतनागच्या संगम बिजबेहडाच्या जवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोंमधून दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मुफ्ती दुसऱ्या गाडीने आपल्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाल्या.

 Mehbooba Mufti car met with an accident
जम्मू काश्मीरमधील 'तहरिक-ए-हुर्रियत'वर सरकारने घातली बंदी; अमित शाहांनी दिली माहिती

नॅशनल कॉन्फरेन्सचे नेता उमर अब्दुल्ला यांनी मुफ्ती यांच्या अपघातानंतर प्रतिक्रिया दिली आहे. रस्ते अपघातात कोणतीही इजा झाली नाही हे ऐकून आनंद झाला. हा अपघात खूप गंभीर असला असता. सरकार या प्रकरणी तपास करेल अशी मला आशा आहे. त्यांच्या सुरक्षेमध्ये कोणती कमी राहिली हे लवकर समोर यावं, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.