Ayodhya Ram Mandir : अयोध्येत पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक ; भाविकांना आवरताना पोलिसांची दमछाक, काहीकाळ दर्शन थांबविले

अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी मंगळवारी भाविकांसाठी राममंदिर खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले आणि तितकेच भाविक मंदिर परिसरात दर्शनाच्या प्रतिक्षेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गर्दीला आवरताना पोलिसांची बरीच दमछाक झाली आणि त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने अयोध्या दौरा करत स्थितीचा आढावा घेतला.
ram mandir
ram mandirsakal
Updated on

अयोध्या : अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी मंगळवारी भाविकांसाठी राममंदिर खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले आणि तितकेच भाविक मंदिर परिसरात दर्शनाच्या प्रतिक्षेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गर्दीला आवरताना पोलिसांची बरीच दमछाक झाली आणि त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने अयोध्या दौरा करत स्थितीचा आढावा घेतला.

रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी राममंदिराबाहेर सोमवारी मध्यरात्रीपासूनच दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. कडाक्याच्या थंडीतही हातात ‘राम ध्वज’ घेतलेले आणि रामनामाचा घोष करणारे हजारो भाविक रांगेमध्ये उभे होते. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारपर्यंत अडीच ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. सर्वसामान्य नागरिकांसाठी मंगळवारी पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे पोलिसांना आणि निमलष्करी दलाच्या जवानांना येथील गर्दी नियंत्रणात ठेवणे कठीण झाले होते.

ram mandir
Ayodhya Ram Mandir : भावांचे बलिदान वरदानात बदलले; पूर्णिमा कोठारी यांनी भावांचे स्वप्न साकार होताना पाहिले

यावेळी ढकलाढकली झाल्याने एक भाविक भोवळ येऊन पडल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हलक्या बळाचाही वापर करावा लागला. दरम्यान, वाढती गर्दी पाहून काही काळासाठी सामान्य भक्तांसाठी प्रवेश थांबवावा लागला होता. गर्दीमुळे येत्या गुरुवारपर्यंत दर्शनाची त्रिस्तरीय व्यवस्था बनविण्यात आली आहे. भाविकांची वाहतूक, त्यांची राहण्याची व्यवस्था, भोजन, आरोग्य, अयोध्‍या दर्शन, सुरक्षा यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

ram mandir
Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेली पुण्यातील चिमुरडी; डोक्यावर मावळा पगडी घातलेला व्हिडिओ होतोय व्हायरल

अयोध्या नगरीमध्ये केवळ भाविकांचीच गर्दी आहे असे नाही तर देशभरातून साधू-संतही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पुढील काही महिने गर्दीचा कायम राहणार असल्याचे राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले. पूर्ण अयोध्या शहर आता राममय झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. अयोध्या विमानतळ सुरू झाल्याने लांबून येणाऱ्या भाविकांना कमी वेळेत याठिकाणी पोहोचता येणार आहे. दरम्यान रेल्वेने येणाऱ्या भाविकांना एकाच स्थानकावर उतरविण्याऐवजी चार वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर उतरविण्याची योजना आहे. अयोध्‍या कॅन्टोन्मेंट, अयोध्‍या धाम, दर्शननगर, रामघाट आणि भरतकुंड ही ती स्थानके असतील.

आदित्यनाथ अयोध्येत

अयोध्येमध्ये झालेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी अयोध्येममध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी मंदिरातील व्यवस्थांचा आढावा घेतला. यावेळी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाविकांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले. उत्तर प्रदेशचे विशेष पोलिस महासंचालक प्रशांत कुमार(कायदा आणि सुव्यवस्था) आणि उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव संजयप्रसाद यांनी परिस्थितीचा आढावा घेत येथे तैनात असलेल्या पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.