पेगॅसस वादळाचे अधिवेशनावर सावट : सरकारविरोधात फौजदारी कारवाईची मागणी

पेगॅसस खरेदी केल्याच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या गौप्यस्फोटानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला आहे.
Pegasus-Phone-Hacking
Pegasus-Phone-HackingSakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इस्राईलशी संरक्षण कराराअंतर्गतच हेरगिरीचे सॉफ्टवेअर पेगॅसस (Pegasus Software) खरेदी केल्याच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या (NewYark Times) गौप्यस्फोटानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला आहे. तर कॉंग्रेसने या मुद्द्यावर संसद अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली असून सर्वोच्च न्यायालयाने सरकारविरोधात फौजदारी कारवाई करावी, असे आवाहनही केले आहे.

पेगॅसस संदर्भातील ताज्या खुलाशानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर नव्याने तोफ डागली. मोदी सरकारने लोकशाही संस्थांवर, राजकीय नेत्यांवर, जनतेवर पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस खरेदी केले होते. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका सर्वांना लक्ष्य केले आहे. हा देशद्रोह आहे, असे आक्रमक ट्विट केले. पाठोपाठ कॉंग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला.

आता आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही सिद्ध केले आहे, की मोदी सरकारने बेकायदेशीरपणे आणि घटनाबाह्य पद्धतीने हेरगिरीचे पेगॅसस स्पायवेअर इस्राईलकडून खरेदी करून त्याचा आपल्याच लोकांविरुद्ध वापर केला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असून हे लोकशाहीचे अपहरण आणि सरळसरळ देशद्रोह आहे, असा प्रहार सुरजेवाला यांनी केला. सुरजेवाला म्हणाले, की अशा कोणत्याही प्रकारच्या खरेदीची माहिती नसल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्वनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले होते. तर सॉफ्टवेअर खरेदी केले नसल्याचा दावा गृहमंत्र्यांनी, संरक्षण मंत्र्यांनी केला होता.

सर्वोच्च न्यायालयातही याबाबत शपथपत्र देण्यात आले होते. यामुळे सरकारने संसदेची फसवणूक केली असून सर्वोच्च न्यायालयाला अंधारात ठेवले आणि जनतेच्या पैशाचा वापर हेरगिरीसाठी केला आहे. हा प्रकार फसवणुकीचा आणि खोटारडेपणाचा असून सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन या सरकारविरुद्ध कारवाई करावी. या मुद्द्यावर सरकारची आणि पंतप्रधानांची आणि पंतप्रधानांची जबाबदारी निश्चित करण्याचा अन्य विरोधी पक्षांच्या सहकार्याने प्रयत्न राहील. यासाठी इतरविरोधी पक्षांसोबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे चर्चा करणार असून संसदेतील रणनितीचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

Pegasus-Phone-Hacking
सोलापूर : मुलांची दररोज चार तासच शाळा! शिक्षकांना 'आरटीपीसीआर'चे बंधन

अधिवेशनात सरकारला जाब विचारणार: राऊत

मुंबई : विरोधी पक्षासह भाजप नेत्यांचेही फोन ऐकले जात आहेत. आमच्या बॅंक खात्यातील लहानसहान तपशीलांची देखील वारंवार चौकशी केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्षाने या विषयी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे तोंड दाबले जात आहे हा आणीबाणीपेक्षा भयंकर प्रकार असल्याचा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र आम्ही येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पुन्हा एकदा आवाज उठविणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.

खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत सध्याची परिस्थिती ही आणीबाणीपेक्षा भयंकर असून लोकशाही कुठे असल्याचा सवाल केला. राहुल गांधीसह आम्ही सगळे जे सांगत होतो त्यात सत्य आणि तथ्य आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे, असे राऊत म्हणाले. मोदी सरकारने २०१७ मध्ये पेगॅसस हे सॉफ्टवेअर विकत घेतलं.

Pegasus-Phone-Hacking
रोख पैसे नाहीत, धनादेश घ्या! सोलापूर बाजार समितीतील अडत्यांचा नियम

इस्राईलसोबत १५ हजार कोटींचा करार झाला होता तेव्हा हे सॉफ्टवेअरही विकत घेतलं होते. मात्र आम्हाला संसदेत याविषयी बोलायला दिले नसल्याचा आरोप राऊत यांनी दिला. संसदेत यापेक्षा वेगळे पुरावे आम्हाला सादर करायचे होते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

या विरोधात सातत्याने आम्ही संसदेमध्ये आणि बाहेरही आवाज उठवत आलोय. देशात प्रमुख पत्रकारांचे, राजकारण्यांचे फोन ऐकले जातात. दोन केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पाळतीवर ठेवले होते असा पुन्हा एकदा आरोप राऊत यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()