मुख्यमंत्र्यांचा ट्राऊझरमधील व्हिडीओ शेअर केल्याबद्दल शिपाई निलंबित

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांचा शर्ट आणि ट्राऊझर घातलेला व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल केरळच्या सामान्य प्रशासन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.
Pinarayi Vijayan
Pinarayi VijayanEsakal
Updated on

केरळचे (Kerala) मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांचा शर्ट आणि ट्राऊझर घातलेला व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल केरळच्या सामान्य प्रशासन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला बुधवारी निलंबित करण्यात आले. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये, विजयन केरळच्या पारंपारिक शर्ट आणि धोतीऐवजी पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून दुबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. (Peon suspended for sharing video of Kerala Chief Minister Pinarayi Vijayan in trousers)

Pinarayi Vijayan
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

हा व्हिडिओ ए मणिकुट्टन (A Manikuttan) यांनी राज्य सचिवालयातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शेअर केला होता. त्याच्या या कृतीमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळली असल्याचे म्हणत त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आता मायदेशी परतण्यापूर्वी काही दिवस दुबईत घालवणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. 29 जानेवारी रोजी उपचारानंतर ते अमेरिकेतून केरळला परतणार होते.

Pinarayi Vijayan
उन्हाबरोबर मावळात राजकीय ‘झळा’

केरळमध्ये उतरण्याऐवजी ते शनिवारी दुबईत दाखल झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 29 जानेवारी रोजी उपचारानंतर ते अमेरिकेतून केरळला परतणार होते. केरळमध्ये उतरण्याऐवजी ते शनिवारी दुबईत दाखल झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.