बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे

बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज किंवा कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे
cyber crime-Fake Calls for Covid Booster Doses
cyber crime-Fake Calls for Covid Booster Dosese sakal
Updated on
Summary

ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोकांना बूस्टर डोस मिळविण्याची घाई झाली आहे.

सरकारने कोविड-19 लसीचा (Covid-19 Vaccine) तिसरा डोस म्हणजेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस (Booster Dose) द्यायला सुरुवात केली आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोकांना बूस्टर डोस मिळविण्याची घाई झाली आहे आणि याचीच संधी साधून फसवणूक करणारे नवीन प्रकारची फसवणूक करत आहेत. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार (Cyber Crime) बूस्टर लसीची माहिती देण्याच्या बहाण्याने लोकांकडून महत्त्वाची माहिती काढून घेत आहेत आणि या माहितीचा वापर करून संबंधितांच्या बॅंक खात्यातून पैसे बेमालूमपणे काढत आहेत. (People are being financially deceived by making fake calls for Covid booster doses)

cyber crime-Fake Calls for Covid Booster Doses
'या' शेअर्सनी दिला जबरदस्त 22000 टक्‍क्‍यांपर्यंत परतावा!

अशी होत आहे कोविड-19 बूस्टर डोसच्या बहाण्याने फसवणूक

फसवणूक करणारे प्रथम तुम्हाला कॉल करतात आणि स्वत:ला सरकारी कर्मचारी म्हणून दाखवतात. हे गुन्हेगार विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनाच कॉल करत आहेत. मग त्यांना कोविडचा दुसरा डोस घेतलेला आहे का, विचारतात. काही प्रकरणांमध्ये, कॉल करणाऱ्याकडे आधीच तुमची सर्व माहिती असते. ते खरे दिसण्यासाठी तुमचे नाव, वय, पत्ता आणि इतर तपशील देखील सत्यापित करतात. काहीवेळा फसवणूक करणारे लसीकरणाची तारीख खरी वाटावी म्हणून शेअर करतात.

त्यानंतर, कॉल करणारा तुम्हाला विचारतो की, तुम्हाला COVID-19 लस बूस्टर डोस घेण्यात स्वारस्य आहे का आणि तुम्हाला त्यासाठी स्लॉट बुक करायचा आहे का. नवीन डोससाठी तारीख आणि वेळ देऊन, फसवणूक करणारा मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी देण्यास सांगतो. येथूनच खरी फसवणूक सुरू होते. OTP हा खरेतर तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी असतो. एकदा तुम्ही त्यांना OTP सांगितल्यावर पैसे तुमच्या बॅंक खात्यातून ट्रान्सफर होतात आणि फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जमा होतात.

cyber crime-Fake Calls for Covid Booster Doses
शेतकऱ्यांसाठी खुषखबर! बॅंकांकडून मिळणार आता वाढीव पीककर्ज

हा घोटाळा टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

तुम्ही लक्षात घ्या, की सरकार फोन कॉलद्वारे लसीचे स्लॉट बुक करत नाही. तुम्हाला COVID-19 लसीसाठी स्लॉट बुक करायचे असल्यास तुम्ही http://cowin.gov.in ला भेट देऊ शकता. तुम्ही आरोग्य सेतू मोबाईल ऍप्लिकेशनद्वारेही पेजला भेट देऊ शकता. जर तुम्ही स्लॉट बुक करू शकत नसाल, तरीही तुम्ही वैध सरकारी ओळखपत्र असलेल्या कोणत्याही लसीकरण केंद्राला भेट देऊन तुमचा डोस मिळवू शकता.

साधारणपणे, OTP सोबत येणारा मेसेज तुम्ही कोणाशीही शेअर करू नये. OTP सोबत येणारा मेसेज तुम्ही नेहमी वाचावा कारण यामुळे तुम्हाला कळेल की तो मेसेज व कोड कोणत्या कामासाठी वापरला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.